नागपूर : नागपूर विमानतळाच्या धावपट्टीवरील विद्युत दिवे बंद असल्याने काळोख होता. त्यामुळे इंडिगोचे मुंबई विमान शुक्रवारी रद्द करण्यात आले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर रात्रीच्यावेळी विमानांना उतरण्यासाठीची विशेष व्यवस्था आहे. या व्यवस्थेत देखील बिघाड झाल्याचे समजते. आज विमानतळावर अचानक सर्वत्र अंधार होता.

धावपट्टीवर अंधार असल्याने विमानतळावरील हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाला विमानांना उतरण्यास परवानगी देणे शक्य नव्हते. रात्री साडेसात वाजेपर्यंत विद्युत दिवे दुरुस्तीचे काम सुरू होते. दरम्यान, इंडिगोची नागपूर ते मुंबई विमान रद्द करण्यात आल्याची माहिती आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai flight canceled due to off runway lights at nagpur airport rbt 74 amy
First published on: 13-04-2024 at 04:05 IST