नागपूर: नेते कार्यकर्त्यांना वापरून घेतात, काही देण्याची वेळ येते तेव्हा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना पुढे करतात, त्यामुळेच कार्यकर्ते का फक्त सतरंजी उचलण्यासाठीच असतात का ? संतप्त सवाल कार्यकर्त्यांकडून केला जातो. पूर्वी काँग्रेसची सत्ता होती तेव्हा या पक्षाचे हेच धोरण होते, आता भाजपची सत्ता असल्याने त्या पक्षातही कमी अधिक प्रमाणात हेच चित्र आहे. काँग्रेसने मात्र यंदा जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन जागांवर उमेदवारी देताना तळागळातून आलेल्या, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कामाचा अनुभव गाठीशी असणाऱ्यांना संधी दिली आहे. नागपूरहून उमेदवारी मिळालेले विकास ठाकरे हे माजी महापौर तर रामटेकच्या उमेदवार या जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विकास ठाकरे हे २००२ मध्ये अडिच वर्षापर्यंत नागपूरचे महापौर होते. राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी नागपूरच्या विकासाठी घसघशीत निधी दिला होता व तेव्हापासूनच नागपूरचे चित्र बदलण्याला सुरुवात झाली होती. रश्मी बर्वे या २०२० ते २०२२ या काळात नागपूर जिल्ह्य परिषदेच्या अध्यक्ष होत्या. या काळात त्यांनी बचत गटाच्या महिलांना रोजगार देण्यासाठी ‌विविध योजना राबवल्या होत्या.

हेही वाचा – विश्लेषण : मराठा मतपेढी मराठवाड्यात किती प्रभावी? जरांगेंमुळे मतदानाची समीकरणे बदलतील?

हेही वाचा – यवतमाळ-वाशिममध्ये निकालाची पुनरावृत्ती की चित्र बदलणार ?

हेही वाचा – चंद्रपुरात काँग्रेसमध्ये उघड तर भाजपमध्ये छुपी गटबाजी

महापालिका असो किंवा जिल्हा परिषद, ग्राम पंचयत असो किंवा पंचायत समिती या सारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काम करताना सदस्यांच्या अनुभवांच्या कक्षा रुंदावतात. पुढे आमदार, खासदार होण्याची संधी मिळाली तर तेथेही या कामाची शिदोरी उपयोगी पडते, नगरसेवक ते आमदार, जि.प. सदस्य ते आमदार असा राजकी प्रवास असणारे अनेक नागपुरात आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थांत काम केल्याचा त्यांना कसा फायदा झाला हे आजतही सांगतात. एक प्रकरे तलागळात काम करणाऱ्यांना संधी दिल्याची भावनाही पक्ष कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचते. काँग्रेसने पक्षाच्या अडचणीच्या काळात ठाकरे, बर्वेंना तिकीट देण्याच्या माध्यमातून हाच संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur congress grassroots formula while deciding candidates former mayor opportunity for zp president cwb 76 ssb
First published on: 24-03-2024 at 11:13 IST