नागपूर : नागपूर मेट्रोचा पहिला टप्पा डिसेंबर २०२२ ला पूर्ण झाल्यावर टप्पा -२ ची सुरुवात होणार आहे. सध्या महापालिका हद्दीत धावणारी मेट्रो आता हद्दी लगतच्या छोट्या शहरांना जोडणार आहे. कशी असेल या प्रकल्पाची रचना जाणून घेऊ या. मेट्रो – २ ची लांबी ४३.८ कि.मी असून यामध्ये ३२ मेट्रो स्टेशनचा समावेश आहे. यावर ६७०८ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पाला ८ जानेवारी २०१९ रोजी राज्य सरकारने मंजुरी दिली होती. त्यानंतर केंद्राने त्याला मान्यता दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

११ डिसेंबर २०२२ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रकल्पाचे भूमिपूजन झाले. प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी नुकताच महामेट्रो- महाराष्ट्र शासन आणि भारत सरकार असा त्रिपक्षीय करार झाला. या करारमुळे प्रकल्पाकरिता लागणारा निधी मिळण्याची प्रक्रिया सुरु होईल व प्रकल्पाला आणखी जलद गती प्रदान होईल. असा विश्वास महामेट्रोने व्यक्त केला आहे.

हेही वाचा : “राजकारणात काहीही होऊ शकते,” धर्मरावबाबा आत्राम असे का म्हणाले?

मेट्रोच्या विस्तारित मार्गिका – (१३ कि.मी.लांबी)

आटोमोटिव्ह चौक ते कन्हान (स्थानके) : पिली नदी, खसारा फाटा, ऑल इंडिया रेडियो, खैरी फाटा, लोक विहार, लेखानगर, कॅन्टोन्मेंट, कामठी पोलीस स्टेशन, कामठी नगर परिषद, ड्रॅगन पॅलेस, गोल्फ क्लब, कन्हान नदी

मिहान ते बुटीबोरी ईएसआर (लांबी : १८.७ कि.मी.) स्थानके: ईको पार्क स्टेशन, मेट्रो सिटी स्टेशन, अशोकवन, डोंगरगांव, मोहगांव, मेघदूत सिडको, बुटीबोरी पोलीस स्टेशन, म्हाडा कॉलोनी, एमआयडीसी – केईसी, एमआयडीसी

हेही वाचा : थंडीची चाहूल! अनेक राज्यांतून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू; भारतीय हवामान खाते म्हणते…

प्रजापती नगर ते ट्रांसपोर्ट नगर (लांबी ५ ५ कि. मी.) स्थानके: पारडी, कापसी खुर्द, ट्रांसपोर्ट नगर
लोकमान्य नगर ते हिंगना (लांबी : ६.६ किमी.) स्थानके: हिंगना माउंट व्ह्यू, राजीव नगर, वानाडोंगरी, एपीएमसी, रायपूर, हिंगना बस, हिंगणा

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur metro expansion of 48 kms 32 new metro stations and 6708 rupees expenditure cwb 76 css