नागपूर : अमरावतीमध्ये फळ व्यावसायिक असलेल्या तरुणाचे नागपुरातील तरुणीशी लग्न जुळले. सहा महिन्यापूर्वी दोघांचाही मोठ्या धुमधडाक्यात साखरपुडा झाला. त्यानंतर तो वारंवार नागपुरात येऊन तिला बळजबरी शारीरिक संबंध ठेवण्यासाठी भाग पाडत होता. शेवटी ही बाब तिने कुटुंबीयांना सांगितली. त्यानंतर तक्रारीवरून भावी पतीवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. फिरोज खान नियामत खान (२१ हैदरपुरा, गड्डे, अमरावती) असे आरोपीचे नाव आहे. २३ वर्षीय तरुणीसोबत फिरोज खानचे सहा महिन्यांपूर्वी साक्षगंध झाले. त्यानंतर तिच्याशी तो मोबाईलवर बोलत होता. यादरम्यान, तो तिला नेहमी व्हिडीओ कॉल करण्यास भाग पाडत होता. तसेच तो तिला भेटायला नागपुरात येत होता. तो सतत तिला शारीरिक संबंधाची मागणी करीत करीत होता. मात्र, तिने  नकार दिला.

हेही वाचा >>> खळबळजनक! विवाहित प्रियकराचा गुप्तांग ठेचून खून? अनैतिक संबंधाची किनार…

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur woman filed rape charges against future husband adk 83 zws
First published on: 23-04-2024 at 18:53 IST