बुलढाणा: बुलढाणा व मध्यप्रदेश राज्याच्या सीमावर्ती भागात पोलिसांनी केलेल्या मोठ्या कारवाईत ४ पिस्टल, जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले.या प्रकरणी परराज्यातील चौघा जणांना गजाआड करण्यात आले आहे.

लोकसभेच्या धामधुमीत शस्त्र तस्करीला वेग आला आहे. पोलीस निवडणूक निमित्त व्यस्त असल्याने हा गोरखधंदा फोफावला आहे. एका कारवाईत सोनाळा पोलिसांनी वसाडी ते हाडियामल दरम्यान कारवाई केली.

हेही वाचा…जगातील सर्वात कमी उंचीच्या महिलेचे नागपुरात मतदान

सापळा रचून केलेल्या या कारवाईत पिस्टलचा सौदा करण्याच्या बेतात असलेल्या चोघांची अंगझडती घेण्यात आली. त्यांच्या जवळून ४ पिस्टल, मॅगझीन सह १७ जिवंत काडतुसे, दुचाकी वाहन, मोबाईल असा २ लाख १७ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या चौघांची कसून चौकशी करण्यात आले आहे. ते मध्यप्रदेश चे रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले. भारसिंग मिसऱ्या खिराडेव, हिरचंद गुमानदेव उचवार( दोन्ही राहणार पाचोरी तहसिल खकणार जिल्हा बऱ्हाणपूर), आकाश मुरलीधर मेश्राम, ( करूनासागर , बालाघाट) संदीप डोंगरे( आमगाव बालाघाट) अशी आरोपींची नावे आहेत.

हेही वाचा…नागपूर : ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड,’येथे’ मतदानाला एक तास उशिरा सुरुवात

त्यांच्याविरुद्ध शस्त्र कायदा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार चंद्रकांत पाटील, सहकारी विनोद शिंबरे, विशाल गवई, मोईनुध्धीन सैय्यद, राहुल पवार, गणेश मोरखडे यांनी ही कारवाई केली