scorecardresearch

Premium

पाईपातून आलेल्या आवाजाने ‘नारायण’ची बोबडी वळली…‘श्रीरामा’ने धाव घेत केले संकटमुक्त; पहा थरारक व्हिडिओ

विहिरीच्या पंपाला पाईप जोडल्यावर आलेल्या पाण्यातून चार फूट लांब नाग बाहेर पडला. त्याला शिताफीने बरणी बंद करून सर्पमित्र रसाळ यांनी ज्ञानगंगा अभयारण्यात सोडले.

buldhana, amboda village, snake rescue, farm
पाईपातून आलेल्या आवाजाने ‘नारायण’ची बोबडी वळली… ‘श्रीरामा’ने धाव घेत केले संकटमुक्त; पहा थरारक व्हिडिओ

बुलढाणा : शेतातील दैनंदिन कामासाठी गेलेल्या शेतकऱ्याला पाईपातून फुस्स आवाज आला अन त्याची बोबडी वळली! भयभीत झालेल्या कास्तकाराने मग धावा केल्यावर घटनास्थळी आलेल्या ‘श्रीराम’ ने त्यांना संकटमुक्त केले…

बुलढाणा तालुक्यातील अंभोडा येथे हा मजेदार व तितकाच थरारक घटनाक्रम घडला. तेथील नारायण बाजीराव पवार हे शेतातील पाणी देण्याचे पाईप बदलण्यासाठी गेले. त्यांनी हाती धरलेल्या पाईपमधून फुस्स फुस्स असा आवाज आल्याने त्यांनी धोका ओळखला. भयभीत झाले असतानाही त्यांनी पाईप खाली टाकून त्याच्या दोन्ही बाजू कपड्याने बांधल्या.

pune crime news, youth killed by his relatives dhayari
पुणे : धायरीत जमिनीच्या वादातून नातेवाईकांकडून तरुणाचा खून, मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांचा नकार
chandrapur crime news, son killed mother, son killed mother with axe marathi news
चंद्रपूर : पोटच्या गोळ्यानेच आईला संपवले, कुऱ्हाडीने केली हत्या; वडील जखमी
washim tyres came off truck hit bystanders killed injured medshi
वाशिम : धावत्या ट्रकचे टायर निखळले अन् रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्यांना धडकले; एकाचा मृत्यू, एक जखमी
Malad
माणुसकीला काळिमा! मुंबईत गटारात फेकलेल्या गोणीत सापडलं नवजात बालक, प्राणीप्रेमीच्या ‘या’ कृतीमुळे मिळालं जीवदान

हेही वाचा… ट्रक चालकासोबत प्राध्यापिकेने केला प्रेमविवाह, नंतर पती पडला भाजीविक्रेतीच्या प्रेमात; भरोसा सेलने…

हेही वाचा… ‘नेट’ परीक्षा ६ ते २२ डिसेंबरपर्यंत, यूजीसीची घोषणा; जाणून घ्‍या अर्जांची प्रक्रिया…

असा बाहेर काढला कोब्रा

दरम्यान याची माहिती देण्यात आल्यावर सर्पमित्र श्रीराम रसाळ घटनास्थळी आले. त्यांनी आवाजावरूनच पाईपमध्ये कोब्रा( नाग) असल्याचे ओळखले. पाईपच्या मधोमध असलेल्या नागराज ला बाहेर काढण्यासाठी त्यांनी शक्कल लढविली. विहिरीच्या पंपाला पाईप जोडल्यावर आलेल्या पाण्यातून चार फूट लांब नाग बाहेर पडला. त्याला शिताफीने बरणी बंद करून रसाळ यांनी ज्ञानगंगा अभयारण्यात सोडले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Snake was rescued in farm at buldhana amboda village scm 61 asj

First published on: 03-10-2023 at 12:16 IST

आजचा ई-पेपर : नागपूर / विदर्भ

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×