यवतमाळ : समाज माध्यमांचा नकारात्मक वापर वाढल्याने दररोज अनेकांना असंख्य अडचणींना सामोरे जावे लागते. ‘सोशल मीडिया’ कसा हाताळायचा याबद्दल बहुतांश नागरिक अनभिज्ञ असल्याने कळत न कळत अनेक सायबर गुन्हे घडतात. जिल्ह्यातील सायबर क्राईम रोखण्यासाठी पोलीस विभागाने सोशल मीडिया जनजागृती रथ तयार केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आज मोबाईल, इंटरनेटशिवाय कोणतेच काम होत नाही. मात्र, या डिजिटल युगात ऑनलाइन व्यवहार करताना अनेकदा फसवणूक होण्याचा धोकाही वाढला आहे. शिवाय सोशल मीडियाच्या वापरामुळे गुन्हेगारी प्रवृत्ती, महिला, मुलींची फसवणूक, लैंगिक छळ आदी प्रकारही वाढले आहेत. या सायबर क्राईमला आळा घालण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांच्या संकल्पनेतून सोशल मीडिया जनजागृती रथ तयार करण्यात आला. या वाहनाच्या माध्यमातून गावागावांमध्ये सोशल मीडियाबाबत जनजागृती करून सायबर क्राईम रोखण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.

हेही वाचा – बुलढाणा : समृद्धी महामार्गावर मालवाहू वाहनाचा अपघात; चालक जागीच ठार

सोशल मीडियाचा वापर करताना कोणती काळजी घ्यावी, मेसेज पोस्ट करताना धार्मिक, जातीय, महिला व मुलींच्या भावना दुखावतील असे मजकूर, फोटो, व्हिडीओ तयार करून पोस्ट करणे, प्रसारीत करणे हा दखलपात्र गुन्हा आहे, याबद्दल नागरिकांमध्ये जनजागृती केली जाणार आहे.

हेही वाचा – चंद्रपूर: आठ वर्षाच्या मुलाने चक्क पक्षांच्या विविध आवाजावर पुस्तक केले प्रकाशित

या रथाची रचनाही आकर्षकपद्धतीने करण्यात आली. या वाहनात टिव्ही, लाऊड स्पीकर देण्यात आले आहे. त्याद्वारे छोट्या छोट्या चित्रफिती दाखवून जनजागृती करण्यात येणार आहे. शिवाय माहितीपत्रकही वाटण्यात येणार आहे. शुक्रवारी या रथाचे लोकार्पण प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते झाले. यावेळी पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, अपर पोलीस अधीक्षक पीयुष जगताप आदी उपस्थित होते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Social media awareness van in yavatmal to prevent cybercrime nrp 78 ssb
First published on: 03-06-2023 at 17:01 IST