नागपूर : वाघांचा मोह भल्याभल्यांना आवरत नाही आणि म्हणूनच राज्यातीलच नाही तर देश आणि विदेशातील पर्यटकांसह ‘सेलिब्रिटी’ महाराष्ट्रात व्याघ्रदर्शनासाठी येत असतात. या सर्वांची पावले व्याघ्रदर्शनासाठी ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाकडे वळतात. मात्र, मराठी चित्रपट अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हीने वेगळी वाट निवडली. नुकतीच ती पेंच व्याघ्रप्रकल्पात येऊन गेली. सफारीदरम्यान तिला वाघाने निराश केले नाही आणि व्याघ्रदर्शनाने हरखून गेलेल्या सोनालीने प्रकल्पाच्या कर्मचाऱ्यांशी मनमोकळेपणाने संवाद साधला.

हेही वाचा – नागपूर विद्यापीठाला महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाची भेट; प्राध्यापकांची पदे तातडीने भरण्याच्या सूचना

Director Bhaurao Karhade announced his new film Fakira
मराठी साहित्यातलं मानाचं पान ‘फकिरा’ रुपेरी पडद्यावर
marathi actor Makarand Anaspure appeared in the look of CM Eknath Shinde in the movie Juna Furniture
‘जुनं फर्निचर’ चित्रपटात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या लूकमध्ये झळकले ‘हे’ प्रसिद्ध अभिनेते, पाहा फोटो
marathi actress smita shewale shares experience about yanda kartavya aahe movie
‘यंदा कर्तव्य आहे’ला १८ वर्षे पूर्ण! नवख्या स्मिता शेवाळेला कशी मिळाली होती भूमिका? तिनेच सांगितला अनुभव
First glimpse of Kiran Gaikwad movie Dev manus released
‘देवमाणूस’ किरण गायकवाडच्या चित्रपटाची पहिली झलक प्रकाशित

हेही वाचा – तुमच्याकडे अग्निशमन यंत्रणा आहे का? नसेल तर..

सोनाली कुलकर्णीने पेंच व्याघ्रप्रकल्पात फक्त सफारीच केली नाही, तर वन्यजीव व्यवस्थापन आणि येथे चालणाऱ्या नाविन्यपूर्ण उपक्रमाबाबत तिने मनमोकळ्या गप्पा मारल्या. व्याघ्रदर्शन ही तिची प्राथमिकता नव्हतीच, तर निसर्गाच्या सान्निध्यात ती जास्त रमली. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाप्रमाणे पेंच व्याघ्रप्रकल्पात पर्यटकांना सहजासहजी व्याघ्रदर्शन होत नाही. मात्र, अभिनेत्री सोनाली कुलकर्णीला वाघाने सहज दर्शन दिले. यावेळी पेंच व्याघ्रप्रकल्प व्यवस्थापनाने तिला पेंच व्याघ्रप्रकल्पाची आठवण म्हणून टोपी भेट दिली. एरवी ‘सेलिब्रिटी’ म्हटले की सहज संवाद दुर्लभ, पण सोनाली कुलकर्णीने मनमोकळ्या गप्पा मारत व्याघ्रप्रकल्पाविषयी पूर्ण माहितीदेखील घेतली. एवढेच नाही तर ‘ट्विटर’ वरून तिने अनुभवाची ध्वनीचित्रफितदेखील दिली.