लोकसत्ता टीम

नागपूर : भाजपचे घोषणापत्र जाहीर करण्यात आले असले तरी संविधान बदलण्याचा कट हा त्यांच्या ४०० पारच्या घोषणेतून दिसतो. ते लोकांच्याही लक्षात आले आहे. त्या दृष्टीने लोकांमध्ये संभ्रम तयार करून आणि समजूत घालावी अशी वेळ भाजपवर आली असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दीक्षाभूमी येथे भेट देऊन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. त्यानंतर ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.

आणखी वाचा-नागपूर: मनोरुग्णांमध्ये तीन वर्षांत ९९ वेळा हाणामारी

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कर्तृत्वाचा आणि देशाला जे संविधान दिले आहे त्यासाठी त्यांच्यापुढे वंदन केले. आदेशाला संविधान किती महत्त्वाचा हे पदोपदी अनुभव यायला लागले आहे. मात्र भारतीय जनता पक्षाचा संविधान बदलण्याचा प्रयत्न गेल्या अनेक दिवसापासून सुरू आहे. संघाचा अजेंडा ते राबवत आहे. देशाचे पंतप्रधान म्हणून ज्या दिवशी निवड झाली होती त्यावेळी त्यांनी पहिले संसदेच्या पायरीला वंदन केले होते आणि त्यानंतर त्यांनी ती इमारतच बदलली. त्यामुळे  देशात आता तिसऱ्यांदा जर भाजपचे सरकार आले तर ते संविधान बदलतील अशी टीकाही जयंत पाटील यांनी केली.

विदर्भात इंडिया आघाडीला चांगला प्रतिसाद मिळत आहे, सर्वच ठिकाणी महाविकास आघाडीच्या सभेला आणि प्रचार यात्रेला लोकांची गर्दी आहे  त्यामुळे विदर्भातील सर्वच्या सर्व जागा इंडिया आघाडीचा विजय होईल असेही पाटील म्हणाले. विजय वडेट्टीवार यांच्या संदर्भात संभ्रम निर्माण करण्याच्या प्रयत्नाच्या पलीकडे आता हातात काही राहिलेले नाही.त्यामुळे महायुतीकडून खोटे नाते आरोप होत असतील.

आणखी वाचा-सुखी संसाराला अहंकाराचे ग्रहण! आर्थिक सक्षम महिलांचा घटस्फोटाकडे कल

धैर्यशील पाटील आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहे त्यासाठी मी आता अकलूज ला जाणार आहे, विजयसिंह मोहिते पाटील यांच्या सर्वे समर्थकांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश होणार आहे.त्याचा माढाच नाही तर पश्चिम महाराष्ट्रात परिणाम दिसेल. माढाचे समीकरण सकारात्मक होते. आता अधिक ताकद वाढेल आणि यशाची खात्री यानिमित्ताने होईल असेही पाटील म्हणाले.