Premium

चिमुकलीवर बलात्कार करणाऱ्यांना कारागृहातून घेतले ताब्यात; दोघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी

घरकामासाठी विकत घेतलेल्या १२ वर्षीय मुलीच्या गुप्तांगाला सिगरेटचे चटके देऊन बलात्कार केल्याच्या प्रकरणात पोलिसांनी पुन्हा दोन आरोपींना कारागृहातून ताब्यात घेतले.

Two accused who raped minor girl
न्यायालयाने दोन्ही आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.(फोटो- प्रातिनिधिक छायाचित्र)

लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर : घरकामासाठी विकत घेतलेल्या १२ वर्षीय मुलीच्या गुप्तांगाला सिगरेटचे चटके देऊन बलात्कार केल्याच्या प्रकरणात पोलिसांनी पुन्हा दोन आरोपींना कारागृहातून ताब्यात घेतले. न्यायालयाने दोन्ही आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. यामध्ये मुख्य आरोपी अझहरुद्दीन शेख याचा समावेश आहे.

मुख्य आरोपी आरोपी तहा अरमान खान आणि मेहुणा अझहर शेख यांनी घरकाम करणाऱ्या मुलीच्या गुप्तांग आणि छातीला सिगारेटचे चटके देऊन बलात्कार केला. तर हिना खानने मुलीच्या पाठीला आणि पोटाला गरम तव्याने चटके देऊन छळ केला. हुडकेश्वर पोलिसांनी या प्रकरणाला गांभीर्याने न घेता आरोपींना पोलीस ठाण्यातच व्हिआयपी वागणूक दिली. तसेच तपासातही आरोपींना लाभ मिळेल याची तजविज केली होती. आरोपींशी सलगी केल्यामुळे पोलीस उपनिरीक्षक बाळू राठोड यांना निलंबित करण्यात आले होते तर ठाणेदार जग्वेंद्रसिंह राजपूत यांना वरिष्ठांनी अभय दिले होते.

आणखी वाचा-चंद्रपूर : आता कचरा संकलन होणार मोटराइज्ड घंटागाडीने, कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांच्या संपामुळे महापालिकेची व्यवस्था

हुडकेश्वर पोलिसांनी थातूरमातूर तपास केल्यामुळे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी हे प्रकरण एएचटीयूच्या प्रमुख रेखा संकपाळ यांच्याकडे दिले होते. त्यांनी या प्रकरणातील अझहर शेख याच्यासह दोन आरोपींना मध्यवर्ती कारागृहातून ताब्यात घेतले. त्यांना शनिवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने दोन्ही आरोपींना दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. या प्रकरणातील तिसरी आरोपी हिना खान ही अद्यापही फरार असून तिचा शोध पोलीस घेत आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Two accused who raped minor girl were taken into custody from jail adk 83 mrj

First published on: 08-10-2023 at 15:50 IST

आजचा ई-पेपर : नागपूर / विदर्भ

वाचा