Premium

“‘ट्रिपल इंजिन’ सरकारमधील तिन्ही पक्षांत तिजोरी लुटण्याची स्पर्धा”, वडेट्टीवार यांची टीका; म्हणाले…

राज्यात मनमर्जी कारभार सुरू असून तिन्ही सत्ताधारी पक्षात सरकारी तिजोरी लुटण्याची स्पर्धा सुरू आहे. तिन्ही पक्षाचे ‘मुखींया’ तिजोरी लुटण्याचे काम करीत असल्याची घणाघाती टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

Vijay Wadettiwar buldhana
"‘ट्रिपल इंजिन’ सरकारमधील तिन्ही पक्षांत तिजोरी लुटण्याची स्पर्धा", वडेट्टीवार यांची टीका; म्हणाले… (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

बुलढाणा : राज्यात मनमर्जी कारभार सुरू असून तिन्ही सत्ताधारी पक्षात सरकारी तिजोरी लुटण्याची स्पर्धा सुरू आहे. तिन्ही पक्षाचे ‘मुखींया’ तिजोरी लुटण्याचे काम करीत असल्याची घणाघाती टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. हे चित्र बदलण्यासाठी नागरिकांनी मंत्र्यांना गावबंदी करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – यवतमाळ जिल्ह्याची पीक पैसेवारी ६१ पैसे; अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांमध्ये संताप

हेही वाचा – सुप्रिया सुळेंची टीका, म्हणाल्या, “दिल्लीचा अदृश्य हात महाराष्ट्राच्या विरोधात”

विदर्भ पंढरी शेगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज, रविवारी बारी समाजाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यानिमित्त वडेट्टीवार येथे आले होते. यावेळी ते म्हणाले, राज्यातील तीन पक्षांचे सरकार सर्वसामान्याच्या मुळावर उठले आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीचे सर्वे नाही की त्यांना मदत नाही. बेरोजगारांची क्रूर थट्टा केली जात आहे. त्यांचे प्रश्न सोडविण्याऐवजी कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात येत आहे. गोरगरीब निराधारांना आधार उरला नाही. तिन्ही पक्षात सरकारी तिजोरी लुटण्याचे काम सुरू आहे. यामुळे या अन्यायग्रस्त समाज घटकांनी त्यांना गावबंदी करावी व रस्त्यावर फिरू देऊ नये. याशिवाय तुमचे प्रश्न, समस्या सुटणार नाही, असे त्यांनी निक्षून सांगितले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Vijay wadettiwar criticized the state government in buldhana scm 61 ssb

First published on: 01-10-2023 at 20:59 IST

आजचा ई-पेपर : नागपूर / विदर्भ

वाचा