Premium

नागपूर : कळमना, वाठोडा परिसरात पाणीच पाणी, नंदनवन झोपडपट्टी पाण्यात

पहाटेपासून सुरू झालेल्या मुसळधार पावासामुळे मध्य पूर्व आणि मध्य नागपुरातील विविध वस्त्यांमध्ये पाणी साचले आहेत.

Water in Kalmana
नागपूर : कळमना, वाठोडा परिसरात पाणीच पाणी, नंदनवन झोपडपट्टी पाण्यात (छायाचित्र – लोकसत्ता टीम/ग्राफिक्स)

नागपूर : पहाटेपासून सुरू झालेल्या मुसळधार पावासामुळे मध्य पूर्व आणि मध्य नागपुरातील विविध वस्त्यांमध्ये पाणी साचले आहेत. अनेकांच्या घरात पहाटे पाणी शिरल्याने लोकांना घराबाहेर काढण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वाठोडा, कळमना, नंदनवन झोपडपट्टी, वर्धमान नगर, जागन्नाथ बुधवारी, हंसापुरी मस्कासाथ या परिसरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले. कळमना बाजारात पाणी शिरले. या भागातील नागनदी भरल्याने राहतेकरवाडी येथील झोपडपट्टीत पाणी शिरले. नंदनवन झोपडपट्टी परिसरातील राजेंद्र नगरमध्ये पाणी शिरल्याने अनेक लोकांना घराबाहेर काढावे लागले असून त्यांची व्यवस्था जवळच असलेल्या महापालिका शाळांमध्ये करण्यात आली आहे.

हेही वाचा – गडचिरोली : झेंडेपार लोहखाणीसंदर्भातील जनसुनावणी रद्द करा; शिष्टमंडळाचे मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना साकडे

हेही वाचा – सोयाबीनवर पिवळा मोझॅकचे आक्रमण, चंद्रपूर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज जाहीर करा; पालकमंत्री मुनगंटीवार यांची मागणी

वाठोडा परिसरात संजय नगरमध्ये एका घराची भिंत कोसळली, मात्र त्यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. नंदनवन, गणेश नगर, सक्करदरा, सुभेदार लेआउट या परिसरातील अनेक अपार्टमेंटमधील पार्किंगमध्ये पाणी साचल्याने लोकांना घराबाहेर पडता येत नाही. गुरुदेव देव व महेश नगर येथील अनेक अपार्टमेंटमध्ये पाहिल्या मजल्यापर्यंत पाणी आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Water in kalmana wathoda area and nandanvan slum in nagpur due to rain vmb 67 ssb

First published on: 23-09-2023 at 10:16 IST

आजचा ई-पेपर : नागपूर / विदर्भ

वाचा