नाशिक :  करोना कक्षातील रुग्णांसोबत घडणारे गैरवर्तन, महिलांना मिळणारी वागणूक, गैरप्रकार याविरोधात वेळोवेळी आवाज उठविला जात असतानाही प्रशासनाकडून विशेष दखल घेतली जात नसल्याचे चित्र शहर परिसरात दिसून येत आहे. येथील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात दाखल करोनाग्रस्त महिलेच्या विनयभंगाचा प्रकार मंगळवारी घडला. बुधवारी त्यास ताब्यात घेण्यात आले असून भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भारतीय जनता पक्षाच्या चित्रा वाघ यांनी शहरातील तपोवन, समाजकल्याण विभागाचे वसतिगृह आदी ठिकाणी भेट देत तेथील त्रुटींविषयी महापालिका आरोग्य अधिकारी आणि प्रशासनासोबत चर्चा करून सुरक्षेच्या मुद्दय़ाकडे लक्ष  वेधले होते. यावर प्रशासनाने काय सुधारणा के ल्या याविषयी कधी माहिती देण्यात आली नाही. शहर परिसरात करोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असतांना करोना केद्रातील समस्या, गैरप्रकार उघड होऊ लागले आहेत.

मंगळवारी येथील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात दाखल करोनाग्रस्त महिला स्वच्छतागृहात गेली असता त्या ठिकाणी रुग्णालयाचा सुरक्षारक्षक संशयित कै लास शिंदे (५६) हा आला. त्याने स्वच्छतागृहाच्या दरवाजावर लाथ मारत महिला आतमध्ये असतानाही दरवाजा उघडून लघवी के ल्याची महिलेची तक्रोर आहे. या प्रकारानंतर महिलेने आरडाओरड केल्यावर संशयित फरार झाला. याप्रकरणी महापालिका वैद्यकीय अधीक्षकांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात संशयिताविरुद्ध तक्रोर दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी दुपारी फरार शिंदे यास पोलिसांनी ताब्यात घेतले. वैद्यकीय तपासणीनंतर गुरुवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे भद्रकाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक साजन सोनवणे यांनी सांगितले.

महापालिके चे आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी संशयित शिंदे याच्यावर पोलिसांनी कारवाई के ली असून महापालिका प्रशासन प्रमुख म्हणून आयुक्त कारवाई करतील, असे सांगितले. रुग्णांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून रुग्णालयात सुरक्षारक्षक, सीसीटीव्ही कॅ मेरे, पॅनिक बटन बसविण्यात आले आहे. अपप्रवृत्तींना आळा बसण्यासाठी महापालिका प्रशासन कारवाई करण्यासाठी कठोर पाऊल उचलणार असल्याचेही डॉ. नागरगोजे यांनी नमूद केले.