नाशिक : शहराच्या जलतरण क्षेत्रात अजोड कामगिरी के लेले पदाधिकारी आणि महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटनेचे माजी सचिव हरिश्चंद्र यशवंत देशमुख ऊर्फ  आबासाहेब देशमुख (७९) यांचे मंगळवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी मीनाताई, मुलगा विलास, मुलगी शिल्पा, सून, नातवंडे असा परिवार आहे. आबांनी जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी म्हणूनही काम पाहिले. नाशिक जिल्हा आणि राज्य जलतरण संघटनेत पदाधिकारी म्हणून काम करताना त्यांनी अनेक खेळाडूंना मार्गदर्शन केले.

जलतरण क्षेत्रातील धुरंधर व्यक्तिमत्त्व ; नाशिकच्या जलतरण क्षेत्राची हानी

पिंपरी : मावळमध्ये विरोधात काम करणाऱ्या नेत्यांवर होणार कारवाई; भाजप नेत्याचा इशारा
jitendra kumar trivedi bjp
भाजपाच्या ‘या’ नेत्यावर तृणमूल नेत्यांविरुद्ध कट रचल्याचा आरोप
Shrikant Shinde
कल्याणमधून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर श्रीकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; भाजपा कार्यकर्त्यांवरही टीका, म्हणाले…
Akhilesh Yadav
रामाची भूमिका साकारणाऱ्या अरुण गोविल यांच्या विरोधात सपाने ऐन वेळी उमेदवार बदलला, नेमकं कारण काय?

अविनाश पाटील, लोकसत्ता

नाशिक : १९६१-६२ चा तो काळ.  वसतिगृहातील इतर मुलांसमवेत तोही गोदातीरी पोहण्यासाठी जात असे. रामवाडी पुलावरून गोदेत सूर मारण्यासाठी त्यांच्यात चढाओढ होई. एके  दिवशी त्याने नेहमीप्रमाणे सूर मारला आणि पाण्यातील कसल्या तरी जाळ्यात तो अडकला. जाळ्यातून बाहेर पडण्यासाठी त्याची दमछाक झाली. तेव्हापासून पाण्याच्या भीतीने अनेक वर्षे तो जलतरणाकडे वळलाच नाही. परंतु, काही वर्षांनी त्यास पुन्हा जलतरणाची आवड निर्माण झाली आणि ती त्याने शेवटपर्यंत जपली. या आवडीनेच त्याला नाशिकच्या जलतरण क्षेत्रातील एक धुरंधर व्यक्तिमत्त्व बनविले. ती व्यक्ती होती हरिश्चंद्र यशवंत देशमुख ऊर्फ  आबासाहेब देशमुख.

सटाणा तालुक्यातील मुल्हेर हे आबांचे मूळ गाव. आबा शिक्षणासाठी नाशिकला आले आणि कायमचे नाशिककर झाले. नाशिक जिल्हा हौशी जलतरण संघटनेचे पदाधिकारी राहिलेल्या आबांची चाणाक्ष नजर एखाद्या खेळाडूमधील कौशल्य सहज हेरत असे. जिल्हा परिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यरत राहिलेल्या आबांची तेव्हाचे शहर अभियंता बी. के . पाटील यांच्याशी चांगली ओळख होती. टिळकवाडीत तेव्हा जलतरण तलाव बांधण्याचे काम सुरू होते. आबाही पाटील यांच्यासमवेत त्या ठिकाणी जात. १४ एप्रिल १९८४ रोजी तलावाचे काम पूर्ण झाल्यानंतरही आबांचे तलावावर जाणे सुरू झाले आणि पाण्याविषयी निर्माण झालेली भीती हळहूळ गायब होत गेली. त्यावेळी स्थापन करण्यात आलेल्या मनपा तरण तलाव सल्लागार समितीत त्यांना स्थान देण्यात आले. या समितीतील इतर सदस्यांमध्ये उद्योगपती किसनलाल सारडा, विक्र म वैशंपायन, मधुसूदन गायधनी, डॉ. कांतिलाल धाडीवाल आदी दिग्गजांचा समावेश होता. त्यावरून आबांचे स्थान लक्षात येईल. १९९२ मध्ये आबा नाशिक जिल्हा हौशी जलतरण संघटनेचे उपाध्यक्ष झाले. पुढे त्यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिकला अनेक राज्यस्तरीय स्पर्धाचे आयोजन यशस्वीपणे झाले. नाशिकमधून दर्जेदार जलतरणपटू तयार व्हावेत म्हणून त्यांनी प्रशिक्षकांना प्रोत्साहन दिले.

स्वत:च्या घरात त्यांनी दोन राष्ट्रीय खेळाडू घडविले. त्यांची मुलगी शिल्पा देशमुख ही डायव्हिंग प्रकारात राष्ट्रीय स्तरापर्यंत मजल मारणारी नाशिकची पहिली खेळाडू ठरली. त्यानंतर तिने १७ वेळा अशी कामगिरी के ली. आबांनी त्या काळी शिल्पाला अमूलची जाहिरात स्विमिंग सूटवर करण्यास परवानगी देत आपल्यातील पुरोगामित्वाचे दर्शन घडविले होते. एक जलतरणपटू ते महाराष्ट्र वॉटरपोलो संघाचा प्रशिक्षक असा कामगिरीचा स्तर उंचावणारा विलास देशमुख हा आबांचा मुलगा. स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलावाशेजारी त्यांच्या मागणीमुळे महिलांसाठी स्वतंत्र बंदिस्त तलाव बांधण्यात आला. आबांनी वृत्तपत्र विक्रीही के ली. १९८२ मध्ये वृत्तपत्र विक्र ेत्यांची संघटना स्थापन झाल्यावर त्यांनी संघटनेत अनेक पदे भूषविली. खेळाडूंची संख्या नव्हे, तर गुणवत्ता वाढली पाहिजे यासाठी शेवटपर्यंत प्रयत्नरत राहिलेल्या आबांच्या निधनाने नाशिकच्या जलतरण क्षेत्राची निश्चितच मोठी हानी झाली आहे.