जळगाव : महायुतीच्या रावेर मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार खासदार रक्षा खडसे यांच्याकडे २४ कोटी ९२ लाख तीन हजार ८३५ रुपयांची मालमत्ता असून पाच वर्षांत साडेसात कोटींनी मालमत्ता वाढली आहे. त्यांच्यावर रुपये ७७, ३६, ३८१ एकूण कर्ज असून त्यात सासरे एकनाथ खडसे यांच्या २३ लाख रुपयांचा समावेश आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रक्षा खडसे यांनी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जात मालमत्तेचे विवरण दिले आहे. शेती आणि व्यापार हे त्यांचे उत्पन्नाचे साधन आहे. २०१९ लोकसभा निवडणुकीवेळी त्यांनी १७ कोटी २७ लाख १३ हजार ७३४ रुपयांची मालमत्ता दाखविली होती. त्यावेळच्या प्रतिज्ञापत्रात खासदार खडसेंकडे कॅप्टिव्हा मोटार, स्वराज ट्रॅक्टर, फोर्ड इंदेवहार मोटार, तसेच सुमारे सहा लाख ५४ हजारांचे दागिन्यांची नोंद होती. यावेळच्या प्रतिज्ञापत्रात खडसेंनी २०२२-२३ वर्षाचे उत्पन्न ८९,५३,३९० रुपये दाखविले असून, कन्या क्रिषिका आणि मुलगा गुरुनाथ यांच्या नावे असलेली मालमत्ता, रोकड व इतर बाबींचाही उल्लेख आहे.

हेही वाचा…देशहितासाठी घेतली जळगावाती मुस्लिमांनी शंभर टक्के मतदान करण्याची प्रतिज्ञा

शेतजमीन, खुले भूखंड व इतर मालमत्ता

जिल्ह्यातील मुक्ताईनगरसह पिंप्रीअकाराऊत, घोडसगाव, हरताळे (ता. मुक्ताईनगर), बोहर्डी (ता. भुसावळ), मानपूर (ता. भुसावळ), कोचरा (ता. शहादा, नंदुरबार), वाकोडी (ता. मलकापूर, जि. बुलडाणा) येथे शेतजमिनी असून, मुक्ताईनगर, कोथळी, सातोड येथे बिगरशेती जमिनी, तसेच खुले भूखंड आहेत. मुक्ताईनगर येथे पेट्रोलपंप, जळगावसह पवई (मुंबई) येथे निवासी इमारती (बाजारमूल्य- रुपये ३,७४, ५३, ५००) असून, कन्या क्रिषिका (रु.२,०९,५४,६००) आणि मुलगा गुरुनाथ (रु.२.०९. ५४, ५००) यांच्या नावेही मालमत्ता आहेत.

हेही वाचा…नाशिकच्या जागेवर राष्ट्रवादीचाच हक्क – अजित पवार गटाचा ठराव

संपत्ती

जंगम मालमत्ता: ६,७७,०७,६०२, स्थावर मालमत्ता – ३,७४,६३,५००
मौल्यवान धातू : २१० ग्रॅम सोने (बाजारमूल्य रु. १४,७०,०००)

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eknath khadse s loan of 23 lakhs on raksha khadse increase in assets by seven and a half crores in last five years psg