मालेगाव : रमजान ईदनिमित्त येथील पोलीस कवायत मैदानावर गुरुवारी पार पडलेल्या सामूहिक नमाज पठणाच्या वेळी गर्दीतल्या एका मुलाने पॅलेस्टाईनचा झेंडा फडकविला. रमजान ईदनिमित्ताने मुस्लिम बांधवांनी शहरातील एकूण १४ ठिकाणी नमाज पठण केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नमाज पठणाचा मुख्य कार्यक्रम पोलीस कवायत मैदानावर एमआयएमचे आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल यांच्या नेतृत्वाखाली पार पडला. या ठिकाणी दीड लाखहून अधिक मुस्लिम बांधवांची उपस्थिती होती. या ठिकाणी नमाज पठणासाठी जमलेल्या गर्दीतील एका मुलाने हातात पॅलेस्टाईनचा झेंडा फडकविल्याचे निदर्शनास आले. इस्रायल देशाकडून पॅलेस्टिनींवर होणाऱ्या कथित अन्यायाचा निषेध म्हणून हा झेंडा फडकविण्यात आला असण्याची शक्यता आहे.

हेही वाचा…धुळ्यात उमेदवार लादल्याचा काँग्रेसवर आरोप – जिल्हाध्यक्षांचा राजीनामा

या प्रकाराबद्दल विचारणा केल्यावर झेंडा फडकविण्याच्या या प्रकाराशी आपला काही संबंध नसल्याचे आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल यांनी सांगितले. पोलिसांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. झेंडा फडकविणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू असून योग्य ती कारवाई करण्यात येत असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांनी दिली. ईदनिमित्त शहरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In malegaon boy waves palestinian flag during eid namaz police investigate incident psg