नाशिक : पंचवटी जलशुद्धीकरण केंद्र येथील जलकुंभाच्या वाहिनीचे काम केले जाणार आहे. तेथून रामवाडी जलकुंभास पाणी दिले जात असल्याने शुक्रवारी या जलकुंभावरून पाणीपुरवठा होणाऱ्या प्रभाग क्रमांक चार, पाच आणि सहामधील अनेक भागांत पाणीपुरवठा होणार नाही. शनिवारी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

याबाबतची माहिती मनपाच्या पाणीपुरवठा विभागाने दिली. जलकुंभाला ऊर्ध्व वाहिनी जोडणीचे काम करणे अत्यावश्यक आहे. शुक्रवारी ते केले जाणार आहे. या जलकुंभावरून रामवाडी जलकुंभात भरणा केला जातो. त्यामुळे या जलकुंभावरून ज्या भागात पाणीपुरवठा होतो, तिथे शुक्रवारी पाणीपुरवठा होणार नाही. यात प्रभाग क्रमांक सहामधील रामवाडी परिसर, आदर्शनगर, कौशल्यानगर, बुरकुलेनगर, कोठारवाडी, रामनगर, बच्छाव हॉस्पिटल, कलावतीआई मंदिर, नागरे मळा, क्रांतीनगरचा काही भाग, तळेनगर, उदय कॉलनीचा काही भाग, मोरे मळा, तुळजाभवानी नगर, रामकृष्णनगर, भावबंधन मंगल कार्यालयाजवळील काही भाग आदी परिसरात तसेच प्रभाग क्रमांक पाचमधील दत्तनगर, कुमावतनगर, शिंदेनगर, नवनाथनगर, द्रोणागिरी, मधुबन कॉलनी, जाधव कॉलनी, जाणता राजा कॉलनी, भन्साळी मळा, रोहिणीनगर, नवरंग मंगल कार्यालय, पेठ नाका, मखमलाबाद नाका, इंद्रकुंड, मालेगाव स्टँड आणि चिंचबन परिसर तसेच प्रभाग क्रमांक चारमधील पेठ रोड कॅनॉललगतचा परिसर, हरिओमनगर, पेठ रोड वजनकाटा, फुलेनगर, विजय चौक, राहुलवाडी, भराडवाडी, लक्ष्मणनगर, वडारवाडी, पेठ रोडवरील शनी मंदिरासमोरील परिसर, दिंडोरी रस्त्यावरील महालक्ष्मी चित्रपटगृहामागील रामनगर, लोकसहकारनगर, आदित्यकुंज सोसायटी, युनियन बँक ते निमाणीपर्यंतचा परिसर आदींचा समावेश आहे. या भागात शुक्रवारी दुपारचा व सायंकाळचा पाणीपुरवठा होणार नाही. शनिवारी सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होईल. नागरिकांनी सहकार्य करावे, असे महापालिकेने म्हटले आहे.

Water scarcity, Badlapur, Ambernath,
बदलापूर, अंबरनाथमध्ये शुक्रवार, शनिवारी पाणीबाणी; तातडीच्या कामांसाठी बॅरेज जलशुद्धीकरण केंद्र १२ तास बंद
Water supply stopped in Goregaon Malad Kandivali on Tuesday
मुंबई : गोरेगाव, मालाड, कांदिवलीमध्ये मंगळवारी पाणीपुरवठा बंद
water supply has been restored but complaints of water shortage are still continue
पिंपरी : पाणीपुरवठा पूर्ववत, मात्र तक्रारींचा ओघ
Why three new swimming pools will start in Mumbai How to plan the municipal corporation
पाण्याचा तुटवडा, तरीही मुंबईत तीन नवे जलतरण तलाव का सुरू होणार? महापालिकेचे नियोजन कसे?