23 January 2020

News Flash

कामोठेत भीषण अपघात, भरधाव गाडीच्या धडकेत 2 ठार; तर 5 जखमी

अंगावर काटा आणणाऱ्या या अपघाताची दृष्य सीसीटीव्हीत कैद

नवी मुंबईच्या कामोठे येथे भरधाव वेगात असलेल्या कारने दिलेल्या धडकेत दोन जणांचा मृत्यू झालाय तर 5 जण जखमी झाले आहेत. रविवारी संध्याकाळी कामोठ्यातील सेक्टर सहामधील एका गजबजलेल्या रस्त्यावर हा भीषण अपघात झाला. अंगावर काटा आणणाऱ्या या अपघाताची दृष्य सीसीटीव्हीत कैद झाली आहेत. मृतांमध्ये ७ वर्षांच्या मुलाचाही समावेश आहे. दरम्यान जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून जखमींपैकी तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.

रविवारी संध्याकाळी सव्वा सातच्या सुमारास रस्त्यावर गर्दी असताना भरधाव वेगात आलेल्या नियंत्रण सुटलेल्या एका कारने काही कळायच्या आत समोरून येणाऱ्या बाइक व स्कूल बसला धडक दिली. पहिल्यांदा या कारने डाव्या बाजूच्या दुचाकीला धडक दिली. त्यानंतर विरुद्ध दिशेला रस्त्याच्या कडेला असलेल्या पादचाऱ्यांवर अंगावर गाडी घातली. एकूण चार दुचाकींना उडवत, पादचाऱ्यांना धडक देत रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या स्कूल बसलाही धडक दिली. गाडीच्या धडकेत एक महिला व पुरुष रस्त्यावरच बेशुद्ध पडले. तर, एक दुचाकीस्वार रस्त्याच्या बाजूला फेकला गेला. या घटनेत 7 वर्षीय सार्थक चोपडे आणि 32 वर्षीय वैभव गुरव या दोघांचा मृत्यू झाला.

दरम्यान या घटनेनंतर कारचालक फरार झाला आहे. पोलिसांनी अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. हा ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’चा प्रकार असावा अशी शक्यता वर्तवली जात आहे.

First Published on July 22, 2019 10:16 am

Web Title: navi mumbai 2 people killed and 4 seriously injured after a speeding car rammed into people in kamothe sas 89
Next Stories
1 नवी मुंबईत मालमत्ता करमाफी
2 तिसऱ्या मुंबईसाठी लवकरच भूसंपादन
3 कामाच्या ठिकाणी जाचाला कंटाळून तिघांचा खून
Just Now!
X