Premium

नवी मुंबई: अतिरिक्त भाडे आकारणाऱ्या १२ बसवर कारवाई

गणेशोत्सवाकरिता कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची लगबग सुरु झाली असून मात्र याचा गैर फायदा घेत गावी जाणाऱ्या या प्रवाशांकडून खासगी बस चालक अव्वाच्या सव्वा दर आकारून प्रवशांची लुटमार करीत असतात.

navi mumbai bus
अतिरिक्त भाडे आकारणाऱ्या १२ बसवर कारवाई

गणेशोत्सवाकरिता कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची लगबग सुरु झाली असून मात्र याचा गैर फायदा घेत गावी जाणाऱ्या या प्रवाशांकडून खासगी बस चालक अव्वाच्या सव्वा दर आकारून प्रवशांची लुटमार करीत असतात. मागील तीन दिवसांपासून आरटीओने महामार्गवर खासगी बसची तपासणी सुरू केली असून २७ पैकी १२ बस धारक निश्चित केलेल्या दरापेक्षा अतिरिक्त भाडे आकारणी करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. आरटीओकडून या १२ बसवर दंडात्मक कारवाई करून ४१रुपये दंड वसूल केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सण- उत्सवात मुंबई, उपनगरातून मोठ्या संख्येने नागरिक गावी जात असतात. गौरी-गणपती सणात संख्या अधिक वाढते. विशेषतः कोकणात हा सण मोठ्या प्रमाणात साजरा होत असल्यामुळे जास्त लोक कोकणात जातात मात्र गरजू प्रवाशांची संख्या पाहता खासगी बसंचालक मालक गेल्या काही वर्षांपासून सणांच्या तोंडावर पुरेपूर फायदा घेत आहेत. ऐन सणासुदीला हे खासगी बस धारक अव्वाच्या सव्वा दर आकारून प्रवाशांची लूट करतात. मात्र अशा या लूटमारीला आता आळा घालण्यासाठी वाशी उप प्रादेशिक कार्यालयाची या बसेसवर करडी नजर ठेवण्यात आली आहे. त्यासाठी पथके तयार केली असून अशा बसेसची तपासणी केली जात आहे. तीन दिवसांपासून अशा खासगी बसेसची तपासणी करण्यात आली असून यात आतापर्यंत १२ बस दोषी अढळल्या असून त्यांच्यावर कारवाई करून ४१ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे, अशी माहिती वाशी उपप्रादेशिक अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी दिली आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Action against 12 buses charging extra fare navi mumbai amy

First published on: 11-09-2023 at 17:24 IST

आजचा ई-पेपर : नवी मुंबई

वाचा