पनवेल ः चार दिवसांपूर्वी कामोठे वसाहतीमधील पोलीस ठाण्यासमोरील रस्त्यावर भाजीमार्केटशेजारी एका ७२ वर्षीय वृद्धाला भरधाव वेगाने आलेल्या दुचाकीस्वारांनी उडवून दुचाकीस्वार फरार झाले. अत्यवस्थेमध्ये वृद्ध बेलापूर येथील अपोलो रुग्णालयात उपचार घेत आहेत.

हेही वाचा – नवी मुंबई: सीबीडी पोलीस ठाण्यात ओपन जिमसह छोटेखानी कोर्ट, कामाच्या तणावात काही क्षण विरंगुळ्यासोबत व्यायामही 

हेही वाचा – भरघोस परताव्याचे आमिष, गुंतवले ४५ लाख ६९ हजार ५०० रुपये आणि परतावा शून्य; फसवणूक प्रकरणी गुन्हा नोंद 

कामोठेसह, कळंबोली, खारघर, नवीन पनवेल या वसाहतींमध्ये धूमस्टाईलने भरधाव वेगाने दुचाकीस्वारांवर नियंत्रण ठेवण्यात पोलीस अपयशी ठरले आहेत. कामोठे वसाहतीमधील सेक्टर ८ येथील धारा कॉम्प्लेक्समध्ये राहाणारे ७२ वर्षीय बलविंदर भट्टी हे मागील आठवड्यात (ता.१२) सकाळी साडेअकरा वाजता भाजी खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडले होते. भट्टी हे पायी चालत असताना त्यांच्या मागून भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीने भट्टी यांना ठोकर मारल्यानंतर ते जमिनीवर पडले. भट्टी यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. याबाबत कामोठे पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा नोंदविला असून पोलीस संबधित फरार दुचाकीस्वाराचा शोध घेत आहेत.