नवी मुंबई : नवी मुंबई पोलीस विभागात पोलिसांकडेही वरिष्ठ लक्ष देत असल्याचे सकारात्मक चित्र दिसून येत आहे. आपल्या अधिकारी कर्मचाऱ्याचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी परिसर प्रसन्न राहावा याची काळजी घेतली जात असून याचेच एक पथदर्शक उदाहरण म्हणजे सीबीडी पोलीस ठाणे आवारात ओपन जिम आणि छोटेखानी  बॅडमिंटन  कोर्ट उभे करण्यात आले आहे. पोलीस म्हणजे कायम टीकेचा धनी असतो. कायदा आणि सुव्यवस्था राखणे हे पोलिसांचे कर्तव्य आहे मात्र तरीही शहरात कुठेही काहीही गडबड झाली, अपघात झाला, सिग्नल तोडले, बेशिस्त गाडी पार्क केली अशा नागरिकांनी केलेल्या चुकांना सुद्धा पोलिसांनाच जबाबदार धरले जाते. वाढती लोकसंख्या त्यासोबत वाढती गुन्हेगारी त्यात कमी मनुष्यबळ त्यामुळे तपास कामात येणारा ताण आणि त्या पाठोपाठ कायम तणावग्रस्त वातावरणात काम करावे लागते. त्यामुळे पोलिसांच्या आरोग्य ढासळते. त्यातून आत्महत्या, कमी वयात हृद्यविकाराने मृत्यू, अशा अनेक घटना घडतात. उच्च रक्तदाब, थारॉईड, मधुमेह तर बहुतांश पोलिसांना असतोच. या परिस्थितीची दखल अति उच्च अधिकारी घेताना दिसत नाहीत. याला अपवाद ठरले आहे ते नवी मुंबई पोलीस आयुक्तालय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : भरघोस परताव्याचे आमिष, गुंतवले ४५ लाख ६९ हजार ५०० रुपये आणि परतावा शून्य; फसवणूक प्रकरणी गुन्हा नोंद 

करोना काळातही केवळ पोलीसच नव्हे तर त्याच्या कुटुंबीयांची काळजी घेण्यासाठी एक विशेष विभागचं सुरु केला होता. आताही अशीच काळजी घेतली जात असून सीबीडी पोलीस ठाण्यात ओपन जिम सुरु करण्यात आले. आयुक्त मिलिंद भारंबे यांनी नवी मुंबहे.  ई पोलीस आयुक्तालयाचा पदभार स्वीकारल्यानंतर  राज्य पातळीवर पथदर्शक ठरणारा इ.एम सी ( मध्यवर्ती मुद्देमाल कक्ष ) हा मागील महिन्यामध्ये सुरू केलेला उपक्रम आहे. या नवीन संकल्पनेतून पोलिस ठाणे मध्ये  व आवारांमध्ये पुराव्या कामे जप्त केलेली गुन्ह्यातील अनेक वाहने तळोजा  येथे एकत्रित ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे सर्व पोलीस ठाण्यांचा आवार आता अगदी स्वच्छ झाला आहे. सीबीडी बेलापूर पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये अनेक वर्षापासून  तळोजा येथे जमा मोठ्या प्रमाणात मोकळी जागा निर्माण झाली. त्या जागेचा सदुपयोग करत  सीबीडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे यांनी सह आयुक्त संजय येनपुरे, पोलीस उपायुक्त  पंकज डहाणे, सहाय्यक आयुक्त राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सीबीडी पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी ओपन जिम सुरू करून सदर जागेचा सदुपयोग केलेला आहे.

हेही वाचा : भाजपच्या निलंबीत माजी नगरसेविकेचा ठाकरे गटाच्या शिवसेनेत प्रवेश

सदर ओपन जिम साठी नवी मुंबई महानगरपालिकेचे ही सहकार्य लाभले आहे. काही दिवसांपूर्वी पोलीस ठाणे आवारातच  वरिष्ठ पोलीस निरीक्षक  गिरीधर गोरे यांनी पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी बॅडमिंटन कोर्ट बनवलेले आहे.   पोलिसांच्या २४ तास कर्तव्यामुळे त्यांच्या आरोग्याची हेळसांड होते. इच्छा असूनही पोलिसांना वेळेअभावी व्यायामाकडे वळणे कठीण होते त्यातूनच पोलिसांमध्ये तणाव निर्माण होत आहे. सततच्या कामाच्या तणावांमध्ये पोलिसांचे मानसिक आरोग्याचाही प्रश्न उपस्थित होत आहे.  अशावेळी  पोलिसांना कामाच्या ठिकाणी मिळालेल्या थोड्या वेळाचा सदुपयोग करून स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्याकरता वरिष्ठ पोलीस निरीक्षक  गिरीधर गोरे यांनी सुरू केलेल्या ओपन जिम या संकल्पनेचे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये कौतुक होत आहे. सदर ओपन जिमचे उद्घाटन  पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या हस्ते सीबीडी पोलीस ठाणे येथे दिमाकदार सोहळा संपन्न झाला आहे. 

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navi mumbai open gym and badminton court at cbd police station css