Premium

नवी मुंबई: यंदा एपीएमसी बाजारात जांभळाची आवक कमीच

एपीएमसी बाजारात मे- जून दरम्यान जांभळाचा हंगाम सुरू असतो. सध्या बाजारात १ ते २ टेम्पो दाखल होत असून यंदा बाजारात जांभळाची आवक कमीच आहे.

jamun
यंदा एपीएमसी बाजारात जांभळाची आवक कमीच ( संग्रहित छायाचित्र)/ लोकसत्ता

एपीएमसी बाजारात मे- जून दरम्यान जांभळाचा हंगाम सुरू असतो. सध्या बाजारात १ ते २ टेम्पो दाखल होत असून यंदा बाजारात जांभळाची आवक कमीच आहे. बदलापूर ,अंबरनाथ येथील जांभळे प्रतकिलो ३००-५००रुपये तर अहमदाबाद बडोदा येथील जांभळे ३००रुपयांनी विक्री होत आहे.
सध्या बाजारात देवगड, रत्नागिरी हापूसचा हंगाम शेवटच्या टप्प्यात असून बाजारात इतर जातीचे आंबे दाखल होत आहेत . त्याच बरोबर एपीएमसीत मे आणि जून या दोन महिन्यात जांभूळ दाखल होते. मागिल वर्षी जांभळाच्या दराने उचांक गाठला होता,परंतु यंदा दर आवाक्यात असले तरी यंदा उत्पादन कमी आहे. दरवर्षी ३-४गाड्या दाखल होतात,परंतु यंदा १-२गाड्या दाखल होत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जांभळाला पावसाअभावी पुरेसे पाणी उपलब्ध न झाल्याने फळ अधिक परिपक्व झाले नाही. त्यामुळे यंदा उत्पादन कमी आहे,अशी माहिती व्यापारी संजय पिंपळे यांनी दिली आहे. जांभळाचे अनेक औषधी गुणधर्म आहेत. उन्हाळ्यात उष्णतेचा त्रास कमी करण्यासाठी जांभूळ उपयुक्त ठरते. गॅसेसचा त्रास, कावीळ, दातदुखी, हिरड्याना सूज, दात कमजोर, मधुमेह, पित्तशामक यावर गुणकारी ठरते.एपीएमसी बाजारात बदलापूर ,अंबरनाथ, अहमदाबाद, बडोदा येथील जांभळे दाखल होतात. बदलापूर ,अंबरनाथ येथील जांभळे टपोरे असून आहेत दर्जा अधिक चांगला आहे . तसेच मधुर रसाळ असतात,त्यामुळे येथील जांभळाना विशेष मागणी असते . अहमदाबाद,बडोदा येथील जांभूळ ३००रुपये तर बदलापूर ,अंबरनाथ येथील जांभळे ३००-५०० रुपये प्रतिकिलो दराने उपलब्ध आहेत.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: This year the arrival of jamun in the apmc market is less navi mumbai amy

First published on: 05-06-2023 at 18:09 IST

आजचा ई-पेपर : नवी मुंबई

वाचा