पालघर : बोईसर भागांमध्ये काही दिवसांपूर्वी पाच वर्षीय मुलगा बेपत्ता झाल्यानंतर त्याचा मृतदेह आढळल्यामुळे खळबळ उडाली होती. मुलाच्या घराच्या शेजारी राहणाऱ्यानेच या पाच  वर्षीय बालकाची निर्घृणपणे हत्या केल्याचे समोर आले आहे.

 धोडीपूजा येथील आयुष नायक हा अंगणात खेळत असताना अचानक बेपत्ता झाला होता.  तारापूर औद्योगिक क्षेत्रातील रुचिरा बारच्या बाजूला असलेल्या नाल्यात पाय बांधलेल्या अवस्थेत आयुषचा मृतदेह आढळला. नायक यांच्या शेजारी राहणारा महेंद्र सिंग  यानेच आयुष याची हत्या केली होती. आयुष घरात येऊन किरकिर करतो म्हणून  महेंद्रसिंग याने बादलीत बुडवून त्याची हत्या केली व मृतदेह फेकून दिले होते. बोईसर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश कदम आणि उपनिरीक्षक आशीष पाटील यांनी गुन्ह्याचा तपास केला.