कासा: शालेय विद्यार्थ्यांना भौगोलिक माहिती मिळावी त्याचबरोबर पर्यटन व्हावे या हेतूने अध्ययन संस्था मुंबई आणि सुगंधा फार्म कुर्झे यांच्या संयुक्त साहाय्याने कुर्झे या ठिकाणी भूगोल उद्यान सुरू केले आहे. आज (२२ एप्रिल) रोजी कुर्झे येथे भूगोल उद्यानाचे उद्घाटन करण्यात आले असून राज्यातील हे चौथे भूगोल उद्यान आहे. विक्रमगड पासून सुमारे १५ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या कुर्झे गावातील सुगंधा फार्ममध्ये, अध्ययन संस्था आणि सुगंधा फार्म यांच्या संयुक्त विद्यमाने भूगोल उद्यानाची उभारणी करण्यात आली. त्याचा उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला.

१५०० चौरस मीटर क्षेत्रफळावरील या भूगोल उद्यानात उठावांच्या मोठ्या नकाशांबरोबरच भूगोलातील विज्ञान आणि गणित समजावून घेण्यासाठी कृतिशील अशी भौगोलिक उपकरणे बसवली आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या भूगोल उद्यानामुळे फिरण्यासोबतच ज्ञानसुद्धा मिळणार आहे. या ठिकाणी अनेक उठावाचे नकाशे आहेत. या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात १६ वेगवेगळ्या प्रकारचे मॉडेल्स तयार करण्यात आले आहेत. उठावाच्या नकाशाच्या अभ्यासातून भौगोलिक रचना समजणार आहे. डोंगर, नदी, नदीचे खोरे, जमिनीवरील चढ-उतार यांची सुद्धा माहिती उठावाच्या नाकाशातून होणार आहे. त्याच प्रकारे सूर्यमाला, तारे, ग्रह, उपग्रह, वेगवेगळे ग्रहणे अशी माहिती सुद्धा विद्यार्थ्यांना समजणार आहे.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हेही वाचा : सोनिया गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे यांना निवडणुकीनंतर पारिवारिक सुख उपभोगता येईल- डॉ. दिनेश शर्मा

अध्ययन संस्थेने कुर्झे येथे सुरू केलेले हे चौथे भूगोल उद्यान आहे. अध्ययन संस्थेकडून या पूर्वी कुडाळ, अहमदनगर, नांदेड या ठिकाणी तीन उद्यान सुरू केले असून या सर्व ठिकाणी दरवर्षी २० हजारापेक्षा जास्त विद्यार्थी भेट दिली असून या उपक्रमामुळे भूगोल विषय समजून घेणे सहजगत होत आहे. त्यामुळे कुर्झे येथे सुरू केलेल्या भूगोल उद्यानाचा फायदा जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील लाखो विद्यार्थ्यांना नक्कीच होणार आहे. जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना या ठिकाणी मोफत प्रवेश दिला जाणार आहे.

भूगोल उद्यानाचे उद्घाटन सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळींच्या महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. किरण सावे यांनी केले. उद्घाटनप्रसंगी प्रा. किरण सावे यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थी नागरिक यांनी या भूगोल उद्यानाला भेट द्यावी असे आवाहन केले. उद्घाटन कार्यक्रमासाठी अध्ययन संस्थेचे अध्यक्ष भुपेंद्र मुजुमदार, सुगंधा फार्मचे नितीन शेलार, अध्ययन संस्थेचे संचालक राजीव वर्तक व परिसरातील नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते.

हेही वाचा : उद्धव ठाकरे, संजय राऊत यांचा बोईसर ते वांद्रे ट्रेनने प्रवास, फोटो आणि व्हिडीओ चर्चेत

भूगोल उद्यानातील प्रमुख प्रकल्पांची नावे

नदीची विविध रूपं, पालघर उठवाचा नकाशा, महाराष्ट्र उठावाचा नकाशा, भारत उठवाचा नकाशा, जगाचा उठवाचा नकाशा जी ज्यात महासागरातील पर्वत रांगा देखील दाखवल्या आहेत, पाणलोट क्षेत्र, स्थानिक अक्षवृत्त, ध्रुव ताऱ्याच्या साहाय्याने स्थानिक अक्षांश मिळवणे, काठीच्या सावलीचा प्रयोग, काठीच्या सावलीच्या साहाय्याने उत्तर दिशा आणि स्थानिक रेखावृत्त मिळवणे, वृत्तजाळी च्या साहाय्याने अक्षांश आणि रेखांश समजून घेणे, शून्य सावली आणि स्थानिक अक्ष्वृत्त आणि पृथ्वीचा काळात आस समजावून घेणे, लोखंडी गोळ्या वर विशिष्ठ ठिकाणी पडलेल्या सावलीच्या साहाय्याने आक्षवृत्त आणि रेखावृत्त समजावून घेणे, खग्रास सूर्ग्रहणाच्या वेळी अतिशय लहान चंद्र खूप मोठ्या असणाऱ्या सूर्याला कसा झाकू शकतो समजणे, हिमालयाची प्रतिकृती, भौगोलिक संज्ञा, वाळवंटातील भुरुपे अशा एकूण १६ प्रतिकृती आहेत. या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात पृथ्वीचा अंतर्भाग, हवामान केंद्र आणि मानवी हस्तक्षेपानंतर होणारी स्थित्यंतरं यां विषयी मॉडेल्स उभारली जाणार आहेत.

हेही वाचा: शिवसेनेला नकली म्हणणाऱ्यांची शैक्षणिक पदवी नकली, उद्धव ठाकरे यांचे आरोपाला प्रतिउत्तर

कार्यक्रमात उपस्थिती

नितीन शेलार (मालक, सुगंधा फार्म), भूपेंद्र मुजुमदार (अध्यक्ष अध्ययन संस्था), उमा दळवी (अध्ययन कार्यवाह), माजी प्राचार्य डॉ. हेमंत पेडणेकर, दीपक कुलकर्णी (ट्रस्टी अध्ययन), उर्मिला करमरकर (अध्यक्ष, मराठी विज्ञान परिषद – बोर्डी विभाग), कुर्झे उपसरपंच श्री मोकाशी आदी मंडळी उपस्थित होती.

Story img Loader