मुख्यालयातील प्रशासकीय ‘अ’ इमारत अजूनही वापरापासून दूर

पालघर: ३१ जानेवारी २०२२ रोजी भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त झालेल्या जिल्हा मुख्यालय संकुलातील प्रशासकीय ‘अ’ इमारतीमध्ये २९ कार्यालय सुरू होण्यासाठी विद्युत जोडणीची प्रतीक्षा आहे. सिडकोतर्फे गेल्या महिन्यात विद्युत जोडणीसाठी अर्ज केला असला तरी आवश्यक बाबींची पूर्तता करून या सर्व कार्यालयांमध्ये वीजपुरवठा होण्यास अजूनही मार्चचा दुसरा आठवडा उजाडणार आहे. ऑगस्ट महिन्याच्या मध्यावर जिल्हा संकुलाचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन झाले असता महिन्याभरात प्रशासकीय इमारती कार्यरत करू असा जिल्हा प्रशासनाने सिडकोच्या सांगण्यावरून केलेला दावा फोल ठरला आहे. वेगवेगळय़ा तांत्रिक अडचणी तसेच करोनाचे कारण सांगून प्रशासकीय इमारत सुरू करण्यास विलंब होत आहे.

officials and employees have breakfast by stopping polling mess at Yavatmals Hivari Polling Station
अरेच्चा! आधी पोटोबा, मग… मतदान थांबवून अधिकारी, कर्मचाऱ्यांची पंगत; यवतमाळच्या हिवरी मतदान केंद्रावर गोंधळ
lighting on trees for decoration, lighting on trees thane marathi news
ठाणे, कल्याण- डोंबिवली, मिरा भाईंदरमध्ये वृक्षांचा गळा घोटण्याचे कार्य सुरूच, उच्च न्यायालयाच्या नोटीस नंतरही शहरात वृक्षांवर विद्युत रोषणाई
Admission Delayed, 500 Students of college of physican and surgeon, Maharashtra, 500 Students Still Awaiting Admission, physician students, surgeon students, admission awating physican students,
मान्यतेनंतरही सीपीएस अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरू करण्यास मुहूर्त सापडेना, ५०० जागांवरील प्रवेशासाठी विद्यार्थी प्रतीक्षेत
Industrial production rate advanced 5.7 percent in February
औद्योगिक उत्पादन दर फेब्रुवारीमध्ये ५.७ टक्क्यांपुढे

फेब्रुवारी अखेपर्यंत प्रशासकीय इमारत कार्यरत होतील असा विश्वास सिडकोने तसेच जिल्हा प्रशासनाने वेळोवेळी व्यक्त केला होता ३१ जानेवारी रोजी या इमारतीला भोगवटा प्रमाणपत्रदेखील प्राप्त झाले असून अजूनही वीज जोडणी न झाल्याने कार्यालय सुरू होण्यास विलंब होत आहे. यासंदर्भात महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता सिडकोने २९ कार्यालयांसाठी वीजजोडणी करण्याचा अर्ज २१ जानेवारी रोजी उप विभागीय कार्यालयाकडे दिला. ही मागणी विभागीय कार्यालयात ११ फेब्रुवारी रोजी प्राप्त होऊन २१ फेब्रुवारी रोजी मंडळ कार्यालयात मंजुरीसाठी पाठवण्यात आली. वीजजोडणी मागणीला मंडळ स्तरावर मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्येक जोडणीकरिता अनामत रक्कम जमा करणे अनिवार्य राहणार आहे. त्यानंतर आवश्यक मीटरची चाचणी प्रक्रिया पूर्ण करून विद्युत मीटर बसवण्यात येतील असे सांगण्यात आले.

विभाग स्थलांतरित करण्याची पूर्वतयारी

प्रशासकीय इमारतीचे काम पूर्ण झाले असून वीजजोडणी लवकरच प्राप्त होईल या आशेवर जिल्हा प्रशासनाने संबंधित विभागांना नवीन मुख्यालय संकुलातील कार्यालयातच स्थलांतरित करण्यासाठी पूर्वतयारी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तरीदेखील नवीन इमारतीमध्ये कार्यालय सुरू होण्यास मार्च महिन्याचा मध्य उजाडेल, अशी शक्यता व्यक्त होत आहे.