27 September 2020

News Flash

Republic Day 2018 : प्रजासत्ताक दिनाला ‘असा’ असेल महाराष्ट्राचा चित्ररथ

शिवराज्याभिषेक सोहळ्याची प्रतिकृती

January 25, 2018 2:36 PM

2 of 2

महाराष्ट्राची मराठमोळी संस्कृती सांगण्यासाठी दरवर्षी कलाकारांमध्ये चुरस लागलेली दिसते. चित्ररथाच्या निर्मितीमध्ये कोणत्या कलाकाराला संधी मिळणार याबाबत कायमच उत्सुकता असते. यंदा ही संधी प्रा. रविंद्र विचारे यांना मिळाली असून यंदाच्या चित्ररथाची संकल्पना त्यांची असेल.

महाराष्ट्राची शान वाढविणारा प्रेरणादायी शिवराज्यभिषेकाचा चित्ररथ हा यंदा महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडविणार आहे. संरक्षण मंत्रालयाच्या तज्ज्ञ समितीने प्रा. विचारे यांच्या संकल्पनेला हिरवा कंदिल दाखविला आहे.

यामध्ये शिवाजी महाराजांच्या प्रतिकृतीसह राज्याभिषेकादरम्यान असणाऱ्या सर्व गोष्टींची हुबेहूब कलाकृती तयार करण्याचा प्रयत्न विचारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केला आहे. यासाठी बऱ्याच दिवसांपासून तयारी सुरु आहे.

या प्रतिकृतीमध्ये शिवाजी महाराजांबरोबरच त्यांचे मावळे, शिवनेरी किल्ला, उपस्थित लोकांचे पोषाख, किल्ल्यावरील तटबंदी, प्रतिकृतींच्या चेहऱ्यावरील हावभाव यां गोष्टींवर अतिशय बारकाईने काम करण्यात आले आहे.

2 of 2

First Published on January 25, 2018 2:36 pm

Just Now!
X