20 November 2017

News Flash

Children’s Day: ‘कुछ कुछ होता है’मधील तारे मोजणारा तो मुलगा आठवतोय का?

इतरही बालकलाकारांनी प्रेक्षकांची मनं जिंकली होती.

November 14, 2016 3:54 PM

1 of 5
parzan-dastur

बॉलिवूडमध्ये आजवर विविध चित्रपटांच्या माध्यमातून कलाकारांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे यात काहीच वाद नाही. विविध धाटणीच्या चित्रपटांमध्ये बालकलाकारांच्या रुपातही काही चेहरे गेल्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. असेच काही चेहरे त्यांनी साकारलेल्या बालकलाकारांच्या भूमिकांसाठी चांगलेलच ओळखले जातात. त्यापैकीच एक चेहरा म्हणजे ‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटातील छोटा सरदार मुलगा. काहीही न बोलता फक्त तारे मोजत जाणारा आणि त्याच्या निरागसतेने अनेकांची मनं जिंकणारा हा मुलगा चित्रपटामध्ये जेव्हा एक संवाद बोलतो तेव्हा तो अनेकांचीच मनं जिंकतो. बऱ्याच वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातील छोट्या सरदारच्या तोंडातून ‘तुस्सी जा रहे हो…तुस्सी ना जाओ’ हे वाक्य आजही अनेकांच्या लक्षात राहिलं आहे. पारजान दस्तुर याने ती भूमिका साकारली होती. या चित्रपटाव्यतिरिक्तही पारजानने जाहिराती आणि इतर चित्रपटातून बालकलाकाराच्या भूमिका साकारल्या होत्या. सोशल मीडियावरुन हाती आलेल्या माहितीनुसार पारजानचे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाले असून सध्यातरी रुपेरी पडद्यावर झळकण्याचे त्याचे प्लॅन्स नाहीत.
पारजानप्रमाणेच इतरही बालकलाकारांनी प्रेक्षकांची मनं जिंकली होती. ते छोटे कलाकार आता कसे दिसत असतील? काय करत असतील याविषयी अनेकांनाच कुतुहल आहे. तेव्हा, जाणून घेऊया अशाच काही सेलिब्रिटी बालकलाकारांविषयी…

1 of 5

First Published on November 14, 2016 3:54 pm