सोलापूर : सोलापुरात यापूर्वी सलग दोनवेळा जनतेने निवडून दिलेले दोन्ही खासदार निष्क्रिय आणि दहा वर्षे नापासच झाले आहेत. आता तिसऱ्यांदा भाजपने उभा केलेला उपरा उमेदवारही निवडणुकीतच नापास होईल, अशा शब्दांत सोलापूर लोकसभेच्या काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी भाजपवर टीकास्र सोडले.

अक्कलकोट व दक्षिण सोलापूर तालुक्यांमध्ये विविध गावांमध्ये जाऊन प्रणिती शिंदे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी भाजपच्या यापूर्वीच्या दोन्ही खासदारांच्या निष्क्रियतेवर टीकात्मक भाष्य केले. त्या म्हणाल्या, दोन्ही खासदार दहा वर्षापैकी एकहा वर्षात चांगल्या कामगिरीच्या माध्यमातून उत्तीर्ण होऊ शकले नाहीत. सर्व दहा वर्षे नापासच झाले आहेत. त्याची शिक्षा मात्र सोलापूरकरांना मिळाली आहे. ही चुकीची पुनरावृत्ती आता तिसऱ्यांदा होणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Hindutva organization, BJP, Solapur,
सोलापुरात भाजपच्या पाठीशी हिंदुत्ववादी संघटना
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
Solapur, Aba Kamble murder case,
सोलापूर : खून का बदला खून; आबा कांबळे खून खटल्यात वृद्ध पैलवानासह सातजणांना जन्मठेप
Balasaheb Thorat
अशोक चव्हाणांच्या जाण्याने नांदेडमध्ये काँग्रेसला फटका बसणार? बाळासाहेब थोरात म्हणाले, “जर ते…”

हेही वाचा – सोलापूर : खून का बदला खून; आबा कांबळे खून खटल्यात वृद्ध पैलवानासह सातजणांना जन्मठेप

हेही वाचा – सांगली : प्रतिस्पर्धी उमेदवारांकडून एकमेकांना शुभेच्छा

दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी भाजपचा गड मानल्या जाणाऱ्या सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात मोठ्या लोकसंख्येच्या आणि भाजपशी बांधिल असलेल्या वीरशैव लिंगायत समाजाशी संपर्क वाढवला आहे. बाळीवेशीत मल्लिकार्जुन मंदिराजवळील प्रसिद्ध सिद्धेश्वर तालमीत आयोजित बैठकीत शिंदे यांनी लिंगायत समाजाला मदतीची हाक दिली. यावेळी श्री स्वामी समर्थ सहकारी सूतगिरणीचे अध्यक्ष राजशेखर शिवदारे, ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिराचे प्रमुख पुजारी राजशेखर हिरेमठ, काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष प्रकाश वाले आदी उपस्थित होते.