मराठी सिनेसृष्टीतील अभिनेता अभिजीत खांडकेकर याने चित्रपट, मालिका नाटक अशा विविध ठिकाणी आपल्या कामगिरीने प्रेक्षकांची मनं जिंकली. इंडस्ट्रीमध्ये कोणीही गॉड फादर नसताना त्याने स्वत:च एक वेगळं स्थान निर्माण केलं. अभिजीतने नुकतीच भार्गवी चिरमुलेला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने त्याच्या स्ट्रगलिंगच्या दिवसांची आठवण शेअर केली आहे.

‘गप्पा मस्ती आणि पॉडकास्ट विथ भार्गवी चिरमुले’ या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत अभिजीतने त्याच्या स्पर्धेतील अनुभव सांगितला. अभिजीत म्हणाला, “महाराष्ट्राचा सुपरस्टार या स्पर्धेचा अनुभव उत्तम होता. सचिन गोस्वामी, सचिन मोटे हे आमचे स्कीट बसवायचे. महेश मांजरेकर, सुप्रिया पिळगांवकर हे परिक्षक होते. त्यामुळे त्यांच्या टीप्सपण खूप छान असायच्या. याचवेळेला माझं मासकॉम संपत आलेलं मी रेडिओमध्ये जॉब करत होतो. तिथून त्यांनी मला काढलं होतं. दोन महिन्यांचा पगार दिला नव्हता. आज अर्थात तिथेच मुलाखतीसाठी बोलावतात. त्याकाळात खूप धावपळ झाली.”

“स्पर्धेमध्ये मला लक्षात आलं की आपल्या मर्यादा काय आहेत. मी शिकलेला अभिनेता नाही आहे. प्रोफेशनली काम करण्याचा अनुभव अजिबात नव्हता. जो अनुभव आमच्यातल्या काही जणांना सगळ्यात उत्तम होता. या स्पर्धेतला सगळ्यात अवघड प्रकार म्हणजे विनोद. निलेश साबळे, तोजपाल वाघ, निखिल राऊत यातल्या अनेकांनी आधीपासून खूप मोठी मोठी काम केली असल्यामुळे प्रत्येकाकडून शिकण्यासारख होतं.”

संकर्षणबद्दल सांगताना अभिजीत म्हणाला, “तेव्हा संकर्षण कऱ्हाडे अगदी भित्रा ससा होता. म्हणजे आज तो जो काही झालाय म्हणजे मला त्याचा खूप अभिमान वाटतो. आभाळ कोसळेलं की काय अशा घाबरणाऱ्या भित्र्या सशाची गोष्ट तो अक्षरशः तसा होता. तो कदाचित त्याच्या अभिनयाचा भाग ही असू शकतो. इतका बदल त्याशोमुळे आमच्यात झाला.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अभिजीत सध्या ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत गायकाची भूमिका साकारत आहे. या मालिकेत उर्मिला कोठारे, प्रिया मराठे, बालकलाकर अवनी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. तर संकर्षणच्या ‘नियम व अटी लागू’ नाटकाचे प्रयोग सुरू आहेत.