ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट किती कमाई करतात?
- 1 / 11
करोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे अनेक चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहेत. पण हे चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाल्यावर किती कमाई करत असतील असा प्रश्न अनेकांना पडला असेल. नुकताच टाइम्स ऑफ इंडियाने ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेल्या चित्रपटांचे हक्क किती रुपयांना विकले गेले यासंदर्भात माहिती दिली आहे. चला जाणून घेऊया...
- 2 / 11
अक्षय कुमारचा 'लक्ष्मी बॉम्ब' हा चित्रपट लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. ‘लक्ष्मी बॉम्ब’ हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यासाठी चित्रपटाचे हक्क १२५ कोटी रुपयांना विकत घेतले आहेत.
- 3 / 11
'भुज' या चित्रपटाचे हक्क ११० कोटी रुपयांना विकले असल्याचे समोर आले आहेत. या चित्रपटात अजय देवगण, संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा, नोरा फतेही, शरद केळकर हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
- 4 / 11
अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या 'दिल बेचारा' चित्रपटाचे हक्क ४० कोटी रुपयांना विकले होते.
- 5 / 11
अमिताभ बच्चन आणि आयुषमान खुराना यांचा 'गुलाबो सिताबो' या चित्रपटाचे हक्क ६५ कोटी रुपयांना विकले गेले.
- 6 / 11
'गुंजन सक्सेना' चित्रपटाचे हक्क ५० कोटी रुपयांना विकले गेले.
- 7 / 11
विद्युत जामवालाच्या 'खूदा हाफिस' चित्रपटाचे हक्क १० कोटींना विकले गेले होते.
- 8 / 11
'लूटकेस' चित्रपटाचे हक्क १० कोटी रुपयांना विकले गेले.
- 9 / 11
'सडक २' या चित्रपटाचे हक्क ७० कोटी रुपयांना विकले गेले आहेत.
- 10 / 11
'शकुंतला देवी' या चित्रपटाचे हक्क ४० कोटींना विकले गेले आहेत.
- 11 / 11
अभिषेक बच्चन आणि इलियाना डिक्रूज यांच्या 'बिग बूल'चे हक्क ४० कोटी रुपयांना विकले गेले आहेत.