
मराठीतील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीमध्ये अभिनेत्री सोनाली खरेचं नाव आवर्जून घेतलं जातं.

सोनालीने मराठी मालिका, चित्रपट करत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं.

मातृदिनाच्या निमित्ताने तिने एका मराठी चित्रपटाची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाची निर्मिती ती स्वतः करणार आहे.

सोनालीने ब्लुमिंग लोटस प्रॅाडक्शन हाऊसची निर्मिती केली आहे.

या प्रॉडक्शन अंतर्गत तिने ‘मायलेक’ या पहिल्या चित्रपटाची घोषणा केली आहे.

आई-मुलीचं सुंदर नातं दाखवण्याचा प्रयत्न सोनाली या चित्रपटाच्या माध्यमातून करणार आहे.

निर्मिती क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या या अभिनेत्रीचा ग्लॅमरस लूक तिच्या चाहत्यांना फार आवडतो.

सोशल मीडियावर सोनाली फार सक्रिय असते.

पारंपरिक तसेच वेर्स्टन या दोन्ही लूकमध्ये ती अगदी उठून दिसते. (फोटो – सगळे फोटो इन्स्टाग्राम)