-
भारतात अल्पावधीतच लोकप्रिय ठरत असलेल्या दक्षिण कोरियाच्या किया मोटर्सने ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच (दि. 7 ऑगस्ट) भारतीय बाजारात आपल्या बहुप्रतिक्षित कॉम्पॅक्ट एसयूव्ही Kia Sonet वरुन पडदा हटवला. त्यानंतर 20 ऑगस्टपासून या गाडीसाठी कंपनीने प्री-बुकिंग घेण्यास सुरूवात केली आणि प्री-बूकिंगच्या पहिल्याच दिवशी सोनेटने एक नवीन विक्रम आपल्या नावे केल्याचा दावा किया मोटर्सने केला आहे. कंपनीची सेल्टॉस ही एसयूव्हीही भारतातील पदार्पणातच प्रचंड लोकप्रिय ठरली होती. विशेष म्हणजे पदार्पणाच्या काही महिन्यांमध्येच सेल्टॉस आपल्या सेगमेंटमधील बेस्ट सेलिंग एसयूव्ही ठरली होती. आता सोनेटने सेल्टॉसचाही रेकॉर्ड मोडल्याचा दावा कंपनीने केला आहे.
-
Kia Motors ने याआधी भारतात Kia Seltos आणि Kia Carnival या दोन गाड्या लाँच केल्या आहेत. तर, Kia Sonet ही कंपनीची तिसरी कार ठरली आहे.
-
किया मोटर्सने सोनेट ही एक कनेक्टेड कार म्हणून सादर केली आहे. यात iMT आणि व्हायरस प्रोटेक्शनसारखे हाईटेक फीचर्स आहेत. या कारला खास भारतासाठी डिझाईन केल्याचे कंपनीने म्हटले आहे.
-
सोनेटमध्येही सेल्टॉसप्रमाणे UVO कनेक्टेड टेक्नोलॉजी आहे. याद्वारे अनेक कनेक्टेड फीचर्स मिळतात. किया सोनेटमध्ये 57 कनेक्टेड फीचर्स देण्यात आले आहेत.
-
कियाने ही एसयूव्ही इंजिनच्या तीन प्रकारांमध्ये सादर केली आहे. यातील दोन पेट्रोल इंजिन (1.2 लिटर आणि 1.0 लीटर टर्बो जीडीआय) आहेत. तर, तिसरं डिझेल इंजिन( 1.5 लिटर टर्बो) असेल.
-
कंपनीच्या अधिकृत वेबसाइट किंवा किया मोटर्सच्या डीलरशिपमध्ये 25,000 रुपयांमध्ये या कॉम्पॅक्ट एसयूव्हीच्या बुकिंगला सुरूवात झाली आहे.
-
किया सोनेट भारतीय मार्केटमध्ये ह्युंडाई व्हेन्यू, मारुती सुझुकी ब्रिझा, Tata Nexon, महिंद्रा एक्सयूव्ही 300, फोर्ड इकोस्पोर्ट या गाड्यांना टक्कर देईल.
-
आंध्र प्रदेशच्या अनंतपुर येथील प्लांटमध्ये किया सोनेट मॅन्युफॅक्चर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे इथूनच ही कार जगभरातील अन्य देशांमध्ये एक्स्पोर्ट केली जाणार आहे.
-
या कॉम्पॅक्ट एसयूव्हीमध्ये 5 स्पीड मॅन्युअल, सिक्स स्पीड मॅन्युअल, 6 स्पीड AT आणि 6 स्पीड iMT चे पर्याय मिळतील.
-
कंपनीने या गाडीमध्ये 10.25 इंच टचस्क्रीन इन्फोटेंन्मेंट सिस्टिम दिली आहे. या सिस्टिमला अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कार-प्लेचा सपोर्ट असेल.
-
तसेच, Bose 7 स्पीकर सिस्टिम, इलेक्ट्रिक सनरूफ, फ्रंट व्हेंटिलेटेड सीट्स आहेत. ही कनेक्टेड कार स्मार्टवॉचद्वारे आणि स्मार्टफोनद्वारेही कनेक्ट करता येते. वायरलेस चार्जिंगचं फीचरही यामध्ये आहे.
-
सुरक्षेसाठी Kia मोटर्सच्या या एसयूव्हीमध्ये शानदार फीचर्स आहेत. यात 6 एअरबॅग, फ्रंट आणि रिअर पार्किंग सेन्सर, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टिम (TPMS), ऑटो हेडलाइट, ब्रेक असिस्ट (BA), इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल (ESC) यांसारखे अनेक दमदार फीचर्स आहेत.
-
किती असू शकते किंमत :- Sonet च्या किंमतीचा खुलासा अद्याप कंपनीने केलेला नाही. पण, 6.5 लाख ते 12 लाख रुपयांदरम्यान या कॉम्पॅक्ट एसयूव्हीची एक्स-शोरुम किंमत असण्याची शक्यता आहे.
-
पुढील महिन्यात म्हणजे सप्टेंबरमध्ये कंपनी ही सोनेट एसयूव्ही लाँच करण्याची दाट शक्यता आहे. त्याचवेळी गाडीच्या किंमतीचाही खुलासा होईल.
-
20 ऑगस्ट रोजी सोनेटच्या प्री-बुकिंगला सुरूवात झाल्यानंतर पहिल्याच दिवशी 6,523 जणांनी या एसयूव्हीसाठी बुकिंग केली व सेल्टॉसचा रेकॉर्ड मोडला, असा दावा कंपनीने केला आहे. 2019 मध्ये किया मोटर्सने सेल्टॉस या एसयूव्हीसोबत भारतात पदार्पण केलं होतं. तेव्हा सेल्टॉससाठी पहिल्याच दिवशी 6,046 जणांनी बुकिंग केलं होतं. विशेष म्हणजे पदार्पणाच्या काही महिन्यांमध्येच भारतीय बाजारात स्थिरावलेल्या अनेक दिग्गज कंपन्यांच्या गाड्यांवर मात करत सेल्टॉस आपल्या सेगमेंटमधील बेस्ट सेलिंग एसयूव्ही देखील ठरली होती.दरम्यान, सोनेटने प्री-बुकिंगच्या बाबतीत सेल्टॉसचा रेकॉर्ड मोडल्याची माहिती देताना, "नव्या सोनेटला मिळालेल्या शानदार प्रतिसादावरुन एखादं चांगलं प्रोडक्ट लाँच करण्यासाठी कोणती वाईट वेळ नसते हे सिद्ध होतं" असे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी के. शिम म्हणाले. भारतात पदार्पण केल्याच्या एका वर्षामध्ये भारतीय ग्राहकांचा ब्रँड Kia वरचा विश्वास वाढल्याचंही यावरुन स्पष्ट दिसत असल्याचंही के. शिम यांनी नमूद केलं. वर्ल्ड क्लास क्वालिटी, पॉवरफुल डिझाइन, लेटेस्ट टेक्नॉलॉजी आणि अनेक शानदार फीचर्स असलेल्या सोनेटच्या रुपात आम्ही ग्राहकांना एक दर्जेदार प्रोडक्ट देत आहोत असं त्यांनी सांगितलं. किती असू शकते किंमत :- Sonet च्या किंमतीचा खुलासा अद्याप कंपनीने केलेला नाही. पण, 6.5 लाख ते 12 लाख रुपयांदरम्यान या कॉम्पॅक्ट एसयूव्हीची एक्स-शोरुम किंमत असण्याची शक्यता आहे. ( सर्व फोटो – Kia.Com) )
Kia Seltos चा रेकॉर्ड मोडला, ‘या’ SUV ला जबरदस्त रिस्पॉन्स; पहिल्याच दिवशी तब्बल…
लाँचिंगआधीच बुकिंगसाठी ग्राहकांचा जबरदस्त रिस्पॉन्स…
Web Title: Kia sonet outperforms seltos records 6523 bookings on first day to launch in september check details sas