-
जपानची वाहन निर्माता कंपनी Honda ने आज ( दि.27 ) भारतीय बाजारात आपली नवीन बाइक Hornet 2.0 लाँच केली आहे. अत्यंत आकर्षक लूक आणि दमदार इंजिन क्षमता असलेल्या या 'स्ट्रीट स्पोर्ट बाइक' च्या लाँचिंगसोबतच कंपनीने भारतीय मार्केटमध्ये 180-200cc इंजिन सेगमेंटमध्ये पहिलं पाऊल ठेवलं.
-
काही दिवसांपूर्वी कंपनीने या बाइकसाठी एक टीझर जारी केला होता. तेव्हापासून या बाइकची बरीच चर्चा सुरू होती. अखेर आज कंपनीने ही बाइक लाँच केली आहे.
-
'होंडा टू व्हीलर्स इंडिया'ने या बाइकसाठी बुकिंग घ्यायलाही सुरूवात केली आहे. कंपनीच्या अधिकृत वेबसाइट किंवा जवळच्या डीलरशिपमधून बाइक बूक करता येईल.
-
Hornet 2.0 ची डिलिव्हरी सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होईल. एका डिजिटल इव्हेंटच्या माध्यमातून कंपनीने ही बाइक लाँच केली.
-
कंपनीने Hornet 2.0 या बाइकला केवळ आकर्षक लूकच दिलेलं नाही, तर यामध्ये अनेक शानदार फीचर्सही दिले आहेत.
-
नवीन Honda Hornet 2.0 च्या एक्स्टीरिअर डिझाइनमध्ये कंपनीने LED लायटिंग असलेले हेडलॅम्प, टेल लॅम्प आणि इंडिकेटर्स दिले आहेत. याशिवाय सध्याच्या ट्रेंडनुसार स्प्लिट सीट्स, ब्लॅक आउट इंजिन पॅनल आणि मस्क्युलर फ्युअल टँक आहे. यामुळे बाइकचं लूक अजून उठून दिसतं.
-
ही बाइक एकूण चार रंगांमध्ये -(पर्ल इग्निअस ब्लॅक, मॅट सँग्रिया रेड मेटेलिक, मॅट एक्सिस ग्रे मेटेलिक आणि मॅट मार्व्हल ब्लू मेटेलिक) खरेदी करता येईल .
-
बाइकच्या फ्रंटला कंपनीने गोल्डन कलरमध्ये अप-साइड-डाउन फोर्क सस्पेन्शन दिलं आहे. या सेगमेंटमध्ये असं लूक पहिल्यांदाच दिसल्याचं म्हटलं जातंय. तर बाइकच्या मागे मोनोशॉक सस्पेन्शन आहे.
-
नवीन Hornet 2.0 बाइकसोबत कंपनी पूर्ण 6 वर्षांची वॉरंटी देत आहे. यामध्ये 3 वर्ष स्टँडर्ड वॉरंटी आणि 3 वर्ष एक्स्टेंडेड वॉरंटीचा समावेश आहे.
-
या बाइकमध्ये कंपनीने अपडेटेड बीएस-6 निकषांसह 184 cc क्षमतेचं होंडा इको टेक्नोलॉजीयुक्त(HET)इंजिन दिलं आहे. हे इंजिन 16.86 PS पॉवर आणि 16.1 Nm टॉर्क निर्माण करतं. ही बाइक केवळ 11 सेकंदांमध्ये 200 मीटरपर्यंतच अंतर कापू शकते असा कंपनीचा दावा आहे.
-
हॉर्नेटमध्ये कंपनीने दोन्ही व्हील्ससाठी डिस्क ब्रेक्स दिले आहेत. याशिवाय सिंगल चँनल अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टिम (ABS) आहे.
-
नवीन हॉर्नेटमध्ये 5 स्पीड गिअरबॉक्स आहेत. ही बाइक 2,047mm लांब, 783mm रुंद आणि 1,064mm उंच आहे. तर, बाइकचा व्हीलबेस 1,355mm इतका आणि 167 mm इतका ग्राउंड क्लिअरन्स आहे.
-
बाइकमध्ये LCD इंस्ट्रूमेंट कन्सोल, 12 लिटर क्षमत मस्क्युलर फ्युअल टँक, स्टायलिश एलॉय आणि इंजिन स्टॉप स्विच यांसारखे अनेक फीचर्स आहेत.
-
नवीन Hornet 2.0 बाइकसोबत कंपनी पूर्ण 6 वर्षांची वॉरंटी देत आहे. यामध्ये 3 वर्ष स्टँडर्ड वॉरंटी आणि 3 वर्ष एक्स्टेंडेड वॉरंटीचा समावेश आहे. 'होंडा टू व्हीलर्स इंडिया'ने या बाइकसाठी बुकिंग घ्यायलाही सुरूवात केली आहे. कंपनीच्या अधिकृत वेबसाइट किंवा जवळच्या डीलरशिपमधून बाइक बूक करता येईल. तर, सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून बाइकची डिलिव्हरी सुरू होईल.
-
कंपनीने नवीन हॉर्नेटची एक्स-शोरुम किंमत 1 लाख 26 हजार 345 रुपये ठेवली आहे. भारतीय बाजारात ही बाइक बजाजच्या पल्सर एनएस 200 आणि टीव्हीएस Apache RTR 200 4V यांना टक्कर देईल. केटीएम 200 ड्यूकलाही ही 'स्ट्रीट स्पोर्ट बाइक' टक्कर देऊ शकते. (सर्व फोटो सौजन्य : honda2wheelersindia.com)
