-
२०२० सालच्या सॅमसंग नोट सिरीजचा फ्लॅगशिप स्मार्टफोन गॅलॅक्सि नोट २० ची किंमत चांगलीच घटली आहे. (All Photos : Amazon)
-
सॅमसंगच्या या स्मार्टफोनची किंमत थोडीथोडकी नव्हे तर तब्बल २२,००० रुपयांपर्यंत कमी करण्यात आली आहे.
-
गॅलॅक्सि नोट २० हा स्मार्टफोन गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये लाँच झाला होता. विशेष म्हणजे हा फोन एस पेनसह आला आहे.
-
ग्लोबल सेमीकंडक्टरच्या कमतरतेमुळे यंदा कोणताही नवीन टीप स्मार्टफोन लॉन्च होणार नाही.
-
दरम्यान, गॅलेक्सी नोट २० ची नवीन किंमत आता ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्ही ठिकाणी लागू केली गेली आहे.
-
सॅमसंगची साइट, अॅमेझॉन आणि रिटेल स्टोअरमध्येही हा फोन नव्या किंमतीने खरेदी करता येईल.
-
९१ मोबाईल्सच्या अहवालानुसार, आता ऑनलाईन स्टोअरमध्ये सॅमसंग गॅलेक्सी नोट २० ची नवी किंमत ५४,९९९ रुपये इतकी आणि तर ऑफलाईन स्टोअरमध्ये ५९,९९९ रुपये इतकी ठरवली गेली आहे.
-
सॅमसंग गॅलेक्सी नोट २० ची जुनी किंमत ७६, ९९९ रुपये इतकी होती. म्हणजेच ही मूळ किंमत कमी होऊन आता तब्बल २२,००० रुपयांपर्यंतची मोठी सूट मिळाली आहे.
-
ग्राहक हा फोन कंपनीच्या साईटवरून ५४,९९९ रुपये इतक्या किंमतीत खरेदी करू शकतात. परंतु, इथे तुम्हाला केवळ ब्रॉंझ आणि हिरवा हे दोनच रंगाचे पर्याय उपलब्ध असतील. इथे निळा मिळणार नाही.
-
तर अॅमेझॉनवर नव्या किंमतीत हा फोन हिरव्या रंगामध्ये उपलब्ध आहे. तर ब्रॉंझ रंगांसाठी ग्राहकांना ७६,९९९ रुपये द्यावे लागतील. तर फ्लिपकार्टवर हा फोन फक्त निळ्या रंगामध्ये उपलब्ध आहे. ज्यासाठी ग्राहकांना ६६,००० रुपये मोजावे लागतील.
-
भारतात हा फोन फक्त 8 जीबी + 256 जीबीच्या केवळ एकाच व्हेरिएंटमध्ये येतो. दरम्यान, प्रिमिअम किंमत असूनही या स्मार्टफोनला 5G सपोर्ट नाही. ५जी सपोर्टकरिता ग्राहकांना गॅलॅक्सि नोट २० अल्ट्रा ५जी घ्यायला हवा.
-
गॅलेक्सी नोट २० च्या स्पेसिफिकेशन्सविषयी सांगायचं झालं तर या फोनमध्ये ६.७ इंचाचा एफएचडी+ सुपर AMOLED प्लस डिस्प्ले, एस पेन सपोर्ट, एक्सीनोस ९९० प्रोसेसरसोबतच रीअरमध्ये १२ एमपी प्राइमरी कॅमेरा, १२ एमपी अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा आणि ६४ एमपी टेलिफोटो कॅमेरा आहे.
-
तर फ्रंटला १० एमपी कॅमेरा आहे. याचसोबत हा फोन ४,३०० एमएएच आणि ४५ डब्ल्यू वायर्ड वेगवान चार्जिंग सपोर्टसह येतो. (All Photos : Amazon)
जबरदस्त फीचर्स असलेला सॅमसंगचा हा स्मार्टफोन तब्बल २२ हजारांनी झाला स्वस्त
सॅमसंगच्या या स्मार्टफोनची नवीन किंमत आता ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्ही प्रकारच्या स्टोअर्समध्ये लागू केली गेली आहे. हा फोन गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये लाँच झाला होता. विशेष म्हणजे हा फोन एस पेनसह आला आहे.
Web Title: Samsung this smartphone with great features gets massive rs 22 thousand price cut in online and offline stores gst