-
शरीरातील व्हिटॅमिन बी१२ ची कमतरता ही सामान्य गोष्ट बनली आहे, मांसाहार आणि दुग्धजन्य पदार्थांचा समृद्ध आहार घेणारे लोकही या समस्येने ग्रस्त आहेत. या पार्श्वभूमीवर गेल्या काही वर्षांत, व्हिटॅमिन बी१२ च्या कमतरतेवर एक संभाव्य उपाय म्हणून पौष्टिक यीस्टकडे (Yeast) लक्ष वेधले गेले आहे, खासकरून त्या लोकांसाठी, जे वनस्पती आधारित आहार घेतात. (फोटो सौजन्य: Freepik)
-
बंगळुरू येथील एस्टर सीएमआय हॉस्पिटलच्या क्लिनिकल न्यूट्रिशन अँड डायटेटिक्सच्या सर्व्हिसेस प्रमुख एडविना राज म्हणाल्या की, हे मूलतः निष्क्रिय यीस्ट आहे, जे बहुतेकदा पावडर स्वरूपात विकले जाते. जे प्रथिने, फायबर आणि बी जीवनसत्त्वांच्या श्रेणीसह विविध पोषक तत्त्वांनी समृद्ध आहे, ज्यामध्ये बी१२ हा एक प्रमुख घटक आहे. (फोटो सौजन्य: Freepik)
-
“प्राणी उत्पादनांमध्ये आढळणाऱ्या बी१२ चा हा संपूर्ण पर्याय नसला तरी अनेक ब्रँडच्या पौष्टिक यीस्टमध्ये या आवश्यक जीवनसत्त्वाचा समावेश असतो, असे राज म्हणाले. (फोटो सौजन्य: Freepik)
-
पौष्टिक यीस्टचे आरोग्य फायदे त्याच्या जीवनसत्वाहून अधिक आहेत. ते त्याच्या चवदार, चटपटीत चवीसाठीदेखील ओळखले जाते, जे विविध पदार्थांची चव वाढवू शकते, ज्यामुळे ते शाकाहारी लोकांमध्ये लोकप्रिय पर्याय आहे. (फोटो सौजन्य: Freepik)
-
तुमच्या दैनंदिन आहारात पौष्टिक यीस्टचा समावेश करणे सोपे असू शकते. “चव वाढवण्यासाठी ते चटणी, सॅलेड, करी किंवा सूपवर टाकण्यासाठी किंवा अतिरिक्त पोषक तत्त्वे वाढविण्यासाठी स्मूदीमध्ये मिसळता येते. तुम्ही हे सँडविच किंवा पास्तामध्ये चीज पर्याय म्हणून देखील देऊ शकता, जे दुग्धजन्य पदार्थ न घालता क्रिमी पोत देण्यास मदत करते.” (फोटो सौजन्य: Freepik)
-
तुम्ही तुमच्या जेवणात पौष्टिक यीस्ट सहजपणे समाविष्ट करू शकता, ज्यामुळे केवळ संभाव्य व्हिटॅमिन बी१२ च्या कमतरतेची भरपाई होत नाही तर त्यांच्या असंख्य आरोग्य फायद्यांसह त्यांची एकूण आहार प्रोफाइलदेखील वाढते. (फोटो सौजन्य: Freepik)
-
परंतु, जर तुम्हाला पोटफुगी किंवा इरिटेबल बाउल सिंड्रोम (IBS) ची लक्षणे आढळली तर पर्यायांसाठी पात्र आहारतज्ज्ञांशी संपर्क साधा. (फोटो सौजन्य: Freepik)
-
बंगळुरू येथील एस्टर सीएमआय हॉस्पिटलच्या क्लिनिकल न्यूट्रिशन अँड डायटेटिक्सच्या सर्व्हिसेस प्रमुख एडविना राज म्हणाल्या की, हे मूलतः निष्क्रिय यीस्ट आहे, जे बहुतेकदा पावडर स्वरूपात विकले जाते. जे प्रथिने, फायबर आणि बी जीवनसत्त्वांच्या श्रेणीसह विविध पोषक तत्त्वांनी समृद्ध आहे, ज्यामध्ये बी१२ हा एक प्रमुख घटक आहे. (फोटो सौजन्य: Freepik)
-
(फोटो सौजन्य: Freepik)
शरीरातील बी१२ ची कमतरता पूर्ण करणारा ‘हा’ शाकाहारी पदार्थ कोणता?
Vitamin B12 Deficiency: मांसाहार आणि दुग्धजन्य पदार्थांचा समृद्ध आहार घेणारे लोकही या समस्येने ग्रस्त आहेत. या पार्श्वभूमीवर गेल्या काही वर्षांत, व्हिटॅमिन बी१२ च्या कमतरतेवर एक संभाव्य उपाय म्हणून पौष्टिक यीस्टकडे (Yeast) लक्ष वेधले गेले आहे
Web Title: What is this vegetarian food that fulfills the deficiency of b12 in the body sap