-
झारखंडचे राजकारण सध्या चांगलेच तापत असल्याचे दिसत आहे. (चंपाई सोरेन/एफबी)
-
माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांनी नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली आहे. (चंपाई सोरेन/एफबी)
-
पीटीआयशी बोलताना चंपाई सोरेन म्हणाले की, “माझ्याबरोबर येणाऱ्या आणि नव्या पक्षाच्या वाढीसाठी सहकार्य करणाऱ्या लोकांचे मी हार्दिक स्वागत करतो.” (चंपाई सोरेन/एफबी)
-
दरम्यान चंपाई सोरेन यांच्याकडे किती संपत्ती आहे आणि त्यांनी किती शिक्षण घेतले आहे?, हे जाणून घेऊया. (चंपाई सोरेन/एफबी)
-
myneta.info वेबसाइटनुसार, चंपाई सोरेन यांची एकूण संपत्ती 2,28,22,491 रुपये आहे.
-
यासोबतच त्यांच्यावर ७६ लाख रुपयांची देणीही आहेत. हा अहवाल 2019 सालचा आहे. (चंपाई सोरेन/एफबी)
-
त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या नावावर वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये 60 लाख रुपये जमा आहेत. (चंपाई सोरेन/एफबी)
-
चंपाई सोरेन यांच्याकडे 1 कोटी रुपयांच्या चारचाकी गाड्या आहेत. ज्यात 34 लाख रुपयांची टोयोटा फॉर्च्युनर, 33 लाख रुपयांची HYWA टाटा एलपीके 2518, 38 हजार रुपयांची ॲम्बेसेडर आणि 45 हजार रुपयांची महिंद्रा कंपनीची जीप यांचा समावेश आहे. (चंपाई सोरेन/एफबी)
-
झारखंडच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या घरात 8 लाख रुपयांहून अधिक किमतीचे दागिने आहेत. (चंपाई सोरेन/एफबी)
-
याशिवाय त्याच्या नावावर तीन बंदुकी आहेत. यात एक लाख रुपये किमतीचे एनपी बोअरचे पिस्तूल, ९५ हजार रुपये किमतीची रायफल आणि ४५ हजार रुपये किमतीची डबल बॅरल बंदूक आहे. (चंपाई सोरेन/एफबी)
-
चंपाई सोरेन यांच्या नावावर ३९ लाख रुपये किमतीच्या ३ शेतजमिनी आहेत. त्यांच्या पत्नीच्या नावावर सुमारे चार लाख रुपये किमतीची बिगरशेती जमीन आहे. ते राहत असलेल्या घराची किंमत सुमारे नऊ लाख रुपये आहे. (चंपाई सोरेन/एफबी)
-
शिक्षणाबद्दल बोलायचे झाले तर झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन फक्त 10वी पास आहेत. (चंपाई सोरेन/एफबी)
Photos : झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांच्याकडे 1 कोटींची वाहने, घरात तीन बंदुका तर एकूण ‘इतकी’ आहे मालमत्ता!
Champai Soren, Champai Soren Net Worth, Champai Soren Property: झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांनी नवीन राजकीय पक्ष स्थापन करणार असल्याची घोषणा केली आहे. चंपाई सोरेन यांच्याकडे जितकी संपत्ती आहे त्याच्या अर्ध्या निम्म्या किमती इतक्या महागड्या गाड्या आहेत. शिवाय त्यांच्याकडे काही बंदुकाही आहेत.
Web Title: Jharkhand ex cm champai cars worth rs 1 crore 3 gun in the house know net worth and education jshd import