१९६२ साली सुद्धा गलवानमधून चीन असाच मागे हटला होता पण त्यानंतर…
- 1 / 15
पूर्व लडाखमध्ये नियंत्रण रेषेजवळ चीनने भारतीय भूभागावर दावा सांगत घुसखोरी केली. त्यामुळे मागच्या दोन महिन्यांपासून या भागामध्ये युद्धजन्य स्थिती निर्माण झाली होता. आता तणाव कमी करण्याच्या प्रक्रियेतंर्गत चिनी सैन्याचे माघारी फिरणे सुरु आहे. १९६२ साली भारत-चीन युद्ध झाले, त्यावर्षी सुद्धा या भागात अशीच स्थिती होती. नेमकं त्यावेळी काय घडलं होतं ते आज आपण जाणून घेणार आहोत. ( फोटो सौजन्य - Express archive)
- 2 / 15
बरोबर ५८ वर्षांपूर्वी जुलै महिन्यात भारतीय आणि चिनी सैन्याने तणाव कमी करण्यासाठी पावले उचलली होती. १५ जुलै १९६२ रोजी 'द संडे स्टँण्डर्ड'च्या पहिल्या पानावर 'गलवान खोऱ्यातून चिनी सैन्य माघारी फिरले' अशा शीषर्कासह ठळक बातमी होती. आठ जुलै २०२० रोजी इंडियन एक्स्प्रेसने पहिल्या पानावर 'गलवान खोऱ्यानंतर हॉट स्प्रिंग सेक्टरमधून दोन्ही देशाचे सैन्य माघारी फिरतेय' या मथळयासह ठळक बातमी छापली होती.
- 3 / 15
१२ जून १९६२: भारताने आमच्या हद्दीत लष्करी चौकी उभी केलीय, असा चीनने आरोप केला. भारताने चीनचा हा आरोप फेटाळून लावला. वृत्त: सिनकियांग-उइघुरमध्ये भारतीय लष्कराने दोन चौक्या उभारल्याचा चीनचा आरोप भारत सरकारने फेटाळून लावला आहे असे वृत्त त्यावेळच्या इंडियन एक्स्प्रेसमध्ये प्रसिद्ध झाले होते. उलट चीप-चाप नदीजवळ चीनने चौकी उभारल्याचा व काराकोरम पासजवळ चिनी सैनिकांना आक्रमक गस्त घालण्याचा आदेश दिल्याबद्दल भारत सरकारने निषेध नोंदवला होता.
- 4 / 15
१४ जून १९६२ : पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी चिनी सैन्याने भारतीय प्रदेशात घुसखोरी केल्याची माहिती दिली. वृत्त: पंतप्रधानांनी युद्धाची शक्यता फेटाळून लावली आहे असा मथळा होता. भारताबरोबर मतभेद निर्माण झाल्याने चीन नाराज आहे. लडाखमधील मोठया प्रदेशामध्ये चिनी सैन्याने घुसखोरी केल्याचे तत्कालिन पंतप्रधानांनी म्हटले होते.
- 5 / 15
२१ जून १९६२: लडाखमधल्या परिस्थिती संदर्भात नेहरूंनी संसदेत माहिती दिली वृत्त: उत्तरेकडच्या सीमेवरील लष्करी स्थिती भारतासाठी आधीपेक्षा जास्त फायद्याची आहे. 'परिस्थिती १०० टक्के समाधानकारक आहे असे मी अजिबात म्हणणार नाही. पण त्यात पहिल्यापेक्षा जास्त सुधारणा होतेय' असे नेहरूंनी म्हटल्याचे वृत्त होते.
- 6 / 15
२३ जून १९६२: दौलत बेग ओल्डीमधून चौकी हटवण्याची चीनची मागणी अजिबात मान्य करणार नाही याचा भारताने पुनरुच्चार केला. परस्पर सहमतीने सैन्य मागे घेण्याचा प्रस्ताव दिला. वृत्त: भारत लडाखमधून चौकी सोडणार नाही असा मुख्य बातमीचा मथळा होता. १४ मे रोजी पाठवलेल्या नोटमध्ये भारताने चीनला परस्पर सहमतीने सैन्य मागे घेण्याचा प्रस्ताव दिला आहे असे उपपराष्ट्र मंत्री दिनेश सिंह यांच्या हवाल्याने वृत्त देण्यात आले होते.
- 7 / 15
११ जुलै १९६२: गलवान खोऱ्यातील भारतीय चौकीला चिनी सैन्याने वेढले वृत्त: गलवान खोऱ्यातील भारतीय चौकीला ४०० चिनी सैनिकांनी वेढा दिला होता.
- 8 / 15
१२ जुलै १९६२: लडाखमध्ये हल्ला झाला तर भारतीय सैन्य प्रत्युत्तर देईल असे परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आले.
- 9 / 15
१४ जुलै १९६२: गलवान खोऱ्यातील चौकीभोवती चिनी सैन्याने आपला वेढा अधिक भक्कम केला. तेव्हा स्वसंरक्षणार्थ गोळीबार करण्याचा इशारा भारताने दिला. वृत्त: गलवान खोऱ्यात चीनने आणखी पुढे येऊ नये यासाठी भारताकडून इशारा देण्यात आला. गलवानमध्ये भारतीय सैनिकांपासून चिनी सैन्य ५० ते ७० यार्डावर आहे असे भारत सरकारने सांगितल्याचे वृत्त त्यावेळी प्रसिद्ध झाले होते.
- 10 / 15
१५ जुलै १९६२: भारतीय चौकीपासून चिनी सैन्य थोडं लांब गेलं वृत्त: भारतापेक्षा चिनी सैन्य १५ पट अधिक बळकट असूनही भारतीय जवानांनी खूप चांगली हिम्मत दाखवली. नवी दिल्लीने दिलेल्या इशाऱ्याचा चीनवर परिणाम दिसतोय असे त्यावेळी बातम्यांमध्ये म्हटले होते.
- 11 / 15
१७ जुलै १९६२: गलवानमधील भारतीय चौकीपासून चिनी सैन्य २०० यार्ड लांब गेले. पण चीनच्या मनात पँगाँगमधील भारतीय चौकीवरुन खदखद होती. वृत्त: ४०० चिनी सैनिक गलवान पोस्टपासून २०० यार्ड लांब गेल्याचे परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याच्या हवाल्याने वृत्त देण्यात आले होते. पँगाँग लेक परिसरात भारताने आपल्या हद्दीत दोन किलोमीटर आत येऊन तीन चौक्या उभारल्याचा आरोप चीनकडून करण्यात आल्याचे वृत्तही त्यावेळी प्रसिद्ध झाले होते. ( फोटो आताचा वापरण्यात आला आहे)
- 12 / 15
२३ जुलै १९६२: हॉट स्प्रिंग भागात गोळीबाराची पहिली घटना घडली. वृत्त: लडाख खोऱ्यात चिनी सैन्याने केलेल्या गोळीबारात दोन जवान जखमी झाले असे वृत्त प्रसिद्ध झाले होते. पँगाँगमध्ये भारताने संयम बाळागला व प्रत्यृत्तर दिले नाही असे वृत्त त्यावेळी प्रसिद्ध झाले होते. चीप-चाप नदीजवळही गस्तीवर असणाऱ्या भारतीय सैनिकांवर गोळीबार झाल्याचे वृत्त होते.
- 13 / 15
आता जुलै २०२० मध्ये लडाखच्या गलवान भागातील पेट्रोलिंग पॉईंट १४ (गलवान खोरं), पेट्रोलिंग पॉईंट १५ (हॉट स्प्रिंग) आणि पेट्रोलिंग पॉईंट १७ (गोग्रा) येथून चिनी सैन्य माघारी फिरले आहे. चीनने या भागातून आपले वाहने, तंबू, सैन्य हटवले आहे.
- 14 / 15
जुलै २०२०: पण पँगाँग टीएसओ सेक्टरमध्ये मात्र चिनी सैन्य मागे हटण्याची प्रक्रिया अत्यंत धीम्यागतीने सुरु आहे.
- 15 / 15
जुलै २०२०: पँगाँगमधील फिंगर फोर हा पहिल्यापासून कळीचा मुद्दा राहिला आहे. चीनने फिंगर फोरपर्यंत रस्ता बांधणी केली आहे तसेच बंकर, पीलबॉक्स, टेहळणी चौकी सुद्धा उभारली आहे.