-
रिलायन्स कंपनीने आपला JioOS द्वारे समर्थित असलेला JioBook लॅपटॉप लॉन्च केला.
-
हे ४ जी डिव्हाइस विद्यार्थ्यांसाठी आहे. तसेच जीओटीव्ही App द्वारे शैक्षणिक कंटेंटमध्ये प्रवेश मिळतो.
-
जिओबुक लॅपटॉपमध्ये कंपनीने मॅट फिनिश दिले आहे. याचे वजन केवळ ९९० ग्रॅम आहे.
-
हे MediaTek MT 8788 प्रोसेसरद्वारे समर्थित आहे आणि यात ११.६ इंचाचा अँटी ग्लेअर HD स्क्रीन मिळते.
-
जिओबुक लॅपटॉपमध्ये ४जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज देण्यात आले आहे. जे मायक्रोएसडी कार्ड स्लॉटच्या मदतीने २५६ जीबी पर्यंत वाढवता येते.
-
जिओबुक हे HD वेबकॅमसह येते. तसेच हे वायरलेस स्कॅनिंग आणि प्रिंटिंगला सपोर्ट करते.
-
जिओबुक हे एक्सटर्नल डिस्प्ले ला कनेक्ट केले जाऊ शकते.
-
कनेक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला २ यूएसबी पोर्ट, १ मिनी HDMI पोर्ट, एक हेडफोन जॅक, ब्लूटूथ ५.० आणि ४जी ड्युअल बँड वाय-फाय मिळेल.
-
रिलायन्सने नुकताच जिओबुक लॉन्च केला आहे. याची किंमत १६,४९९ रुपये आहे. ५ ऑगस्टपासून Amazon आणि रिलायन्स डिजिटल स्टोअरवर विक्री सुरू होणार आहे.

VIDEO: “लो चली मै अपने देवर की बारात लेके” दिराच्या लग्नात जावा जावांचा तुफान डान्स; पाहुणेही झाले थक्क