’10 ऑटोमॅटिक गिअर’ असलेली देशातील एकमेव SUV लाँच, Fortuner ला टक्कर
- 1 / 15
'10-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स'चा पर्याय असलेली दमदार Endeavour ही ऑफ-रोड एसयुव्ही Ford ने मंगळवारी BS-6 इंजिनसह लाँच केली. (सर्व छायाचित्र सौजन्य - फोर्ड इंडिया)
- 2 / 15
नव्या इंजिनसह आलेली Endeavour बीएस-4 मॉडेलच्या तुलनेत अधिक मायलेज देईल, असा कंपनीचा दावा आहे. गाडीचा मालयेज वाढलाय, यासोबतच बीएस-4 मॉडेलच्या तुलनेत किंमतही जवळपास 1.45 लाख रुपयांनी कमी झालीये.
- 3 / 15
पण, या कमी किंमतीचा फायदा ३० एप्रिलपर्यंत बुकिंग करणाऱ्यांसाठीच असेल. त्यानंतर एक मेपासून कंपनी या गाडीच्या किंमतीत वाढ करणार आहे. पण...
- 4 / 15
आता, या SUV मध्ये कंपनीने आपले मोबिलिटी आणि कनेक्टिव्हिटी सोल्यूशन 'फॉर्डपास' फीचर दिले आहे.
- 5 / 15
या सिस्टिममुळे व्हेइकलमध्ये स्टार्ट, स्टॉप, लॉक आणि अनलॉक करण्याचे फंक्शन मिळतात. तसेच, तुम्हाला फ्युअल लेवल, डिस्टन्स-टू-एम्प्टी आणि व्हेइकल लोकेशन जाणून घेण्याची सुविधा मिळेल.
- 6 / 15
अपडेटेड Endeavour मध्ये BS6 कम्प्लायंट 2.0-लिटर इकोब्लू डिझेल इंजिन आहे. हे इंजिन 170ps ची ऊर्जा आणि 420Nm टॉर्क निर्माण करते.
- 7 / 15
ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टिम, अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कार-प्लेसोबत 8-इंच टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टिम, पॅनोरोमिक सनरूफ, सेमी-ऑटो पॅरलल पार्क असिस्ट, पुश स्टार्ट बटण, आठ बाजूंनी अॅड्जस्ट करता येणारे ड्रायव्हर आणि फ्रंट पॅसेंजर सीट देण्यात आले आहेत.
- 8 / 15
हिल लाँच असिस्ट आणि हिल डिसेंट कंट्रोल यांसारखे फीचर्सही आहे.
- 9 / 15
विशेष म्हणजे यामध्ये 10-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा पर्याय आहे. 10-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स असलेली ही देशातील एकमेव कार असल्याचं सांगितलं जात आहे.
- 10 / 15
ही एसयुव्ही Titanium 4X2 AT, Titanium+ 4X2 AT आणि Titanium+ 4X4 AT या तीन व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आली आहे.
- 11 / 15
अपडेटेड Endeavour भारतीय बाजारात टोयोटाच्या फोर्च्युनरला तगडी टक्कर देईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
- 12 / 15
नव्या कारच्या हेडलाइटच्या डिझाइनमध्ये थोडा बदल झालाय, उर्वरित लुक बीएस-4 मॉडेलप्रमाणेच आहे.
- 13 / 15
अनुक्रमे 29.55 लाख, 31.55 लाख आणि 33.25 लाख रुपये इतकी एक्स-शोरुम किंमत आहे. पण...
- 14 / 15
पण, ही किंमत ३० एप्रिलपर्यंत बुकिंग करणाऱ्यांसाठीच असेल. त्यानंतर एक मेपासून कंपनी या गाडीच्या किंमतीत वाढ करणार आहे.
- 15 / 15
(सर्व छायाचित्र सौजन्य - फोर्ड इंडिया)