
हनुमान जयंतीनिमित्त आज देशभरात अनेक ठिकाणी हनुमान मंदिरांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे.

महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेशसह अन्य राज्यांमध्ये धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

काही ठिकाणी हनुमान चालिसा पठणाचे आयोजन करण्यात आले आहे.

दिल्लीतील सर्वात उंच हनुमानाच्या मूर्तीजवळ आकर्षक रोषणाई

हनुमान जयंतीनिमित्त दिल्लीतील झंडेवालाजवळील श्री सिद्ध हनुमान मंदिर आकर्षक रोषणाईने उजळून निघाले आहे.

या हनुमानाच्या मंदिरात ५६ नैवेद्य ठेवण्यात आले आहेत.

दिल्लीच्या कॅनॉट प्लेस येथील हनुमान मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली आहे

हनुमान जयंतीनिमित्त कॅनॉट प्लेस येथील हनुमान मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली आहे.

महाराष्ट्रातही आज हनुमान जयंतीचा उस्ताह पाहायला मिळाला.

हनुमान जयंती निमित्त नागपुरातील तेलनखेडी हनुमान मंदिरात भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.