-
अयोध्येतील रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा हा देशासाठी ऐतिहासिक क्षण होता.
-
या सोहळ्यात देशातील अनेक मोठे नेते, संत, बॉलिवूड सेलिब्रिटी, क्रिकेटर्स आणि अनेक दिग्गज मंडळी सहभागी झाले होते.
-
हा सोहळा केवळ अयोध्येपुरता मर्यादित राहिला नाही, तर देशाच्या इतर अनेक भागातही साजरा करण्यात आला.
-
राम मंदिरातील प्रभु रामाच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त देशातील अनेक मंदिरे आणि धार्मिक स्थळांवर विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
-
भारतातील अनेक भाविक देवाचे दर्शन घेण्यासाठी देशातील विविध मंदिरांमध्ये पोहोचले.
-
लोकांनी मंदिरात मोठे एलईडी टीव्ही लावून रामलल्लाचे दर्शन घेतले आणि पूजाही केली.
-
अनेक भारतीयांना यानिमित्ताने आपल्या घराबाहेर सुदर सजावट करत रांगोळ्या काढल्या आणि हा दिवस दिवाळीसारखा साजरा केला.
-
या सोहळ्याचा आनंद शेअर बाजारातही दिसून आला. यावेळी शेअर बाजारात कोणताही व्यवहार झाला नाही.
-
दरम्यान लुधियानाातील स्टॉक अँड कॅपिटल लिमिटेडमध्ये लोकांनी आज दिवाळी साजरी केली. लोकांनी फटाके फोडत आनंद व्यक्त केला.
-
याशिवाय इस्कॉन मंदिरातही रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त आकर्षक सजावट करत पूजा-अर्चा करण्यात आली
-
तर मुंबईतील इस्कॉन मंदिरातही भाविकांमध्ये असेच उत्साहाचे वातावरण होते. जिथे देवाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती.
-
इस्कॉन मंदिरात भगवान श्रीकृष्णाची पूजा केली जाते. राम आणि कृष्ण हे दोघेही भगवान विष्णूचे अवतार आहेत. यामुळे येथील कृष्ण मूर्तीची विशेष पूजा करण्यात आली.
(फोटो स्रोत: इंडियन एक्सप्रेस)

Prashant Kishor on AAP loss : दिल्ली निवडणुकीत केजरीवालांच्या ‘आप’चा पराभव का झाला? राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी सांगितली कारणे