-
रामनवमी हा हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक आहे.
-
रामनवमी हा सण चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमीला साजरा केला जातो.
-
रामनवमीनिमित्त मुंबईतील पवईमधील सात वर्षाचा बालकलाकार आयुष सिद्धार्थ कांबळेने प्रभू श्री रामाचे विश्वविक्रमी पोर्ट्रेट साकारले आहे.
-
३,५०० आर्टिफिशियल फुलांपासून प्रभू श्री रामाचे मोझॅक पोर्ट्रेट साकारले आहे.
-
हे पोर्ट्रेट ३ फुट लांब व ४ फुट रुंद आहे.
-
या पोर्ट्रेटमध्ये ६ रंगाच्या फुलांचा वापर करण्यात आला आहे.
-
हे पोर्ट्रेट पूर्ण करण्यासाठी १२ तासाचा कालावधी लागला आहे.
-
या चित्रातील प्रभू श्री रामाचं स्मितहास्य विशेष आकर्षण ठरत आहे.
-
या पोर्ट्रेटची नोंद वर्ल्ड रेकॉर्ड इंडियामध्ये केली आहे.
-
आयुष हा पवई इंग्लिश हायस्कूलमधील इयत्ता पहिलाचा विद्यार्थी आहे.
-
बालकलाकार आयुष कांबळेने या आधीही साडे चार वर्षाचा असताना माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे पोर्ट्रेट साकारून विश्वविक्रम केला होता.
-
(सर्व फोटो सौजन्य : आयुष कांबळे/सोशल मीडिया)

IND vs ENG : स्वत:ची विकेट पाहून अक्षरही अवाक्, गिलने तर डोक्यालाच लावला हात; आदिलच्या जादुई चेंडूचा VIDEO व्हायरल