आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या भगिनी वाय एस शर्मिला यांनी आज (४ जानेवारी) काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणूगोपाल आदी प्रतिष्ठीत आणि महत्त्वाचे नेते उपस्थित होते. गेल्या अनेक दिवसांपासून शर्मिला या काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत, अशी चर्चा रंगली होती. तेलंगणाच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी स्वत:च्या पक्षाचे उमेदवार उभे न करता काँग्रेसला पाठिंबा दिला होता. त्यानंतर आता शर्मिला यांनी थेट काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

वाय व्ही सुब्बारेडी आणि शर्मिला यांच्यातील चर्चा निष्फळ

शर्मिला या आंध्र प्रदेशचे दिवंगत नेते तथा माजी मुख्यमंत्री वायएसआर रेड्डी यांची कन्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून वायएसआरसीपी पक्षाचे खासदार वाय व्ही सुब्बारेडी आणि शर्मिला यांच्यात बोलणी सुरू होती. सूत्रांच्या माहितीनुसार जगनमोहन रेड्डी यांनीच सुब्बारेड्डी यांना चर्चेसाठी शर्मिला यांच्याकडे पाठवले होते. शर्मिला यांनी वायएसआरसीपीमध्ये प्रवेश करावा, असा प्रस्ताव जगनमोहन रेड्डी यांनी शर्मिला यांच्यासमोर ठेवला होता. मात्र शर्मिला यांनी तो अमान्य केला. आता शर्मिला यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

Yogi Adityanath up rally
उत्तर प्रदेशात नरेंद्र मोदी आणि योगींच्याच विरोधकांपेक्षा अधिक सभा!
Narayan Rane, Vinayak Raut,
रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये ‘कडवट’ माजी-आजी शिवसैनिकांमध्ये लढत
cm siddaramaiah
कर्नाटकात ५० खोके प्रयोग; मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी भाजपावर केला खळबळजनक आरोप
narendra modi rahul gandhi lalu yadav
“मुघलांच्या मानसिकतेतून…”, राहुल गांधी – लालू यादवांच्या ‘त्या’ व्हिडीओवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हल्लाबोल

“राहुल गांधी पंतप्रधान व्हावेत, माझ्या वडिलांचे स्वप्न”

काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर राहुल गांधी देशाचे पंतप्रधान व्हावेत, ही माझ्या वडिलांचे स्वप्न होते. त्यासाठी मी प्रयत्न करेन, असे शर्मिला म्हणाल्या. शर्मिला यांचा वायएसआरटीपी हा स्वत:चा पक्ष आहे. त्या तेलंगणातील याआधीच्या बीआरएस सरकारवर सडकून टीका करायच्या. याच टोकाच्या टीकेमुळे तेलंगणाच्या पोलिसांनी शर्मिला यांना अनेकवेळा अटक केलेली आहे. पोलिसांच्या कामात अडथळा निर्माण केल्यामुळे त्या अलीकडे चर्चेत आल्या होत्या.

शर्मिला यांना राज्यसभेत खासदारकी?

दरम्यान, काँग्रेस शर्मिला यांना राज्यसभेत खासदारकी देण्यास तयार आहे. मात्र शर्मिला या खासदारकीस तेवढ्या उत्सूक नाहीत. याबाबत वायएसआरटीपी आणि शर्मिला यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली. शर्मिला यांना दिल्या जाणाऱ्या पदावर तसेच जबाबदारीवर येत्या ८ जानेवारी रोजी निर्णय होईल, असे शर्मिला यांनी वायएसआरटीपीच्या नेत्यांना सांगितले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार काँग्रेसने शर्मिला यांना दक्षिणेतील राज्यांचे माध्यम प्रभारीपद देण्याचीही तयारी दाखवलेली आहे. तसेच आगामी निवडणुकीत काँग्रेस पक्ष शर्मिला यांच्याच नेतृत्वाखाली आंध्र प्रदेशची निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे आंध्र प्रदेशच्या राजकारणात आगामी काळात काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.