लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्र राज्याच्या ६५ व्या स्थापना दिनानिमित्त मुंबईमधील मलबार हिल परिसरातील राज भवन, दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज पार्क, वांद्रे येथील म्हाडा मुख्यालय, मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलासह विविध ठिकाणी ध्वजारोहण आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी मतदारसंघातील मतदारांची भेट घेत त्यांच्याशी संवाद साधण्यावर भर दिला.

Fire decoration material godown, decoration material godown Sinhagad road area,
सिंहगड रस्ता भागात सजावट साहित्याच्या गोदामात आग, रहिवासी भागात घबराट; अर्ध्या तासात आग आटोक्यात
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
anand dighe s image used by mahayuti
महायुतीच्या प्रचारपत्रकावर आनंद दिघे यांची प्रतिमा
rahul gandhi 10 janpath house
“माझ्या वडिलांचं इथेच निधन झालं, त्यामुळे या घराचा…”, राहुल गांधींनी १०, जनपथबाबत केलं विधान!
Priyanka Gandhi
Priyanka Gandhi: प्रियंका गांधींची प्रचार मोहीम ३ नोव्हेंबरपासून
article about loksatta durga award 2024 event celebration
लोककलेच्या गजरात रंगलेला ‘दुर्गा पुरस्कार’
Lakshmi Pujan in traditional fervor fireworks at the business premises
लक्ष्मीपूजन पारंपारिक उत्साहात, व्यापारी पेठेत आतषबाजी
designing degree course
शिक्षणाची संधी: डिझाइन पदवी प्रवेश परीक्षा

राज भवन येथे राज्यपाल रमेश बैस यांनी ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. तसेच सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छाही दिल्या. यावेळी राजभवनातील अधिकारी व कर्मचारी, राज्य राखीव पोलीस दलाचे जवान, तसेच मुंबई पोलीस दलाचे अधिकारी व जवान उपस्थित होते. तसेच राज्यपालांनी दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे झालेल्या मुख्य शासकीय सोहळ्यातही ध्वजारोहण करून जनतेला संबोधित केले.

आणखी वाचा-नऊ महिन्यात मुंबईत तिसऱ्या आरोपीची आमहत्या, कोठडीतील सुरक्षेबाबत प्रश्न

‘देशातील सर्वाधिक साक्षरतेचे प्रमाण असलेल्या राज्यांपैकी महाराष्ट्र हे एक राज्य आहे. जगभरातील विद्यार्थी, संशोधक आणि अभ्यासकांना आकर्षित करणारी उच्च दर्जाची अनेक विद्यापीठे आणि व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या शैक्षणिक संस्था आपल्या राज्यात आहेत. लोकशाही टिकवून ठेवण्यासाठी, तसेच बळकट करण्यासाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा असून लोकसभा निवडणुकीत सर्व मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा’, असे आवाहनही राज्यपालांनी केले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्य सचिव नितीन करीर, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त व प्रशासक भूषण गगराणी, पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, विविध देशांचे मुंबईतील वाणिज्यदूत, मानद वाणिज्यदूत, सशस्त्र सैन्य दलांचे वरिष्ठ अधिकारी आदी उपस्थित होते.

मुंबई महानगरपालिकेतर्फे क्रीडाभवन येथे सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पालिकेच्या संगीत अकादमीच्या वाद्यवृंदाने देशभक्तीपर गीतांचे वाद्य संगीताच्या माध्यमातून सादरीकरण केले. तसेच वांद्रे पूर्व येथील ‘म्हाडा’च्या मुख्य कार्यालयातही ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी खेरवाडी पोलीस ठाण्यातील पोलीस पथक, महाराष्ट्र सुरक्षा बल पथक व म्हाडातील सुरक्षा रक्षकांनी राष्ट्रध्वजाला सलामी दिली. तसेच म्हाडाच्या कर्मचाऱ्यांनी देशभक्तीपर गीतांचेही सादरीकरण केले. यावेळी म्हाडाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर, मुख्य अभियंता शिवकुमार आडे आदी अधिकारी, अभियंते व कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते. तसेच मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्र- कुलगुरू डॉ. अजय भामरे, प्रभारी कुलसचिव डॉ. बळीराम गायकवाड, अधिकारी, शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.

आणखी वाचा-मुंबई : कर्णबधिरांसाठी विशेष संकेतस्थळाची निर्मिती

महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबईतील विविध चाळी व इमारतींमध्ये होम हवन, पूजा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले होते. तसेच सुट्टीचे औचित्य साधत मुंबईकरांची पावले सांस्कृतिक कार्यक्रम, नाटक, चित्रपट पाहण्यासाठी नाट्यगृह व चित्रपटगृहांकडे वळली. तर अनेकांनी मुंबईतील पर्यटनस्थळीही गर्दी केली होती.