संतोष प्रधान

बिहारच्या राजकारणात १९९०च्या दशकात लालूप्रसाद यादव, नितीशकुमार आणि रामविलास पासवान या समाजवादी चळवळीतील तीन नेत्यांचा उदय झाला. या तिन्ही नेत्यांनी राष्ट्रीय आणि राज्याच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजाविली. सुमारे तीन दशकांनंतर या नेत्यांची दुसरी पिढी राज्याच्या राजकारणात पाय रोवण्याचा प्रयत्नात आहे. यापैकी एक चिराग पासवान.  त्यांच्या पक्षाने अलीकडेच लोकसभा निवडणुकीसाठी भाजपशी युती केली.

dispute between mahayuti is not solved in Nandurbar Shinde group still away from campaigning
नंदुरबारमध्ये महायुतीतील वाद मिटेनात, शिंदे गट अजूनही प्रचारापासून दूर
MNS workers are active in the campaign of Sunetra Pawar In Baramati
बारामतीत मनसेचे कार्यकर्ते सुनेत्रा पवारांच्या प्रचारात सक्रीय
chhatrapati sambhajinagar, Chandrakant Khaire, Imtiaz Jaleel, Eid, lok sabha election 2024
औरंगाबादमध्ये मुस्लीमबहुल भागातही शिवसेनेचा राबता वाढला, खैरे आणि इम्तियाज जलील यांची गळाभेट
Mira Bhayander BJP office bearer enters Shiv Sena Thackeray faction
राज ठाकरेंच्या महायुतीच्या पाठिंबामुळे उत्तर भारतीय नाराज; मिरा भाईंदर भाजप पदाधिकाऱ्यांनी पक्ष सोडला

२०२० मध्ये झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री नितीशकुमार यांचे पंख छाटण्यासाठी भाजपने चिराग पासवान यांचा पुरेपूर उपयोग करून घेतला होता आणि तो प्रयोग यशस्वी झाला होता. यंदा नितीश आणि चिराग एकत्र असले तरी बिहारमधून भाजपला जास्तीत जास्त जागा मिळवून देण्यात चिराग पासवान भाजपच्या मदतीला येतात का, याची उत्सुकता असेल. बिहारमधील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्य जागावाटपात ४० पैकी पाच जागा या चिराग पासवान अध्यक्ष असलेल्या लोकजनशक्ती पार्टीला (रामविलास) सोडण्यात आल्या आहेत. वास्तविक भाजपने चिराग यांचे काका आणि दिवंगत रामविलास पासवान यांचे बंधू पशूपती पारस यांच्या राष्ट्रीय लोकजनशक्ती पार्टीशी युती केली होती. पशूपती पारस हे मोदी मंत्रिमंडळात मंत्री होते. पण बिहारमधील बदलत्या राजकीय समीकरणात भाजपने काकाऐवजी पुतण्याशी युती केली. चिराग पासवान यांच्या पक्षाला पाच जागा सोडताना रामविलास पासवान विक्रमी मतांनी निवडून आलेला हाजीपूर हा मतदारसंघ चिराग यांच्यासाठी सोडण्यात आला. सध्या चिरागचे काका पशूपती या मतदारंसघाचे खासदार आहेत. या घडामोडींमुळे संतप्त झालेल्या पशूपती पारस यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देत पुतण्याच्या विरोधात लढण्याची घोषणा केली. 

यंदा बिहारमध्ये भाजप व नितीशकुमार यांच्या युतीसमोर लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जतना दलाचे आव्हान आहे. अशा वेळी चिराग भाजपला कितपत उपयुक्त ठरतात यावरच त्यांचे राजकीय भवितव्य अवलंबून आहे.

अभिनेता ते नेता :  चिराग पासवान यांना खरे तर अभिनयाची आवड. पण चित्रपट क्षेत्रात फारसे यश न मिळाल्याने त्यांनी राजकारणात नशीब अजमविण्याचा प्रयत केला.  काकांमुळे पक्षाची सूत्रे हाती घेण्यात त्यांना यश आले नाही.