माजी पंतप्रधान आणि जेडीएस प्रमुख एचडी देवेगौडा यांचा नातू प्रज्वल रेवण्णा यांच्या कर्नाटक लैंगिक छळाच्या आरोपावरून काँग्रेसने सोमवारी भाजपावर निशाणा साधला. काँग्रेस नेते पवन खेरा यांनी मंगळवारी सत्ताधारी भाजपावर हल्लाबोल केलाय. खासदार प्रज्वल रेवण्णा आणि त्यांच्या वडिलांविरोधात गैरवर्तनाचा आरोप असताना पंतप्रधान कर्नाटकात त्यांच्या प्रचारासाठी का आले? असा प्रश्न खेरा यांनी विचारला आहे. जनता दला (धर्मनिरपेक्ष)ने आता प्रज्वल रेवण्णा यांना निलंबित केले. भाजपाने कर्नाटकमध्ये निवडणूक लढवण्यासाठी युतीवर शिक्कामोर्तब केले आहे.
अहमदाबाद येथील राजीव गांधी भवन येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे मीडिया आणि प्रचार विभागाचे अध्यक्ष म्हणाले की, “गेल्या काही दिवसांपासून तुम्ही कर्नाटक घोटाळ्याबद्दल ऐकले असेल. प्रज्वल रेवण्णा कोण आहेत ते? मोदीजींच्या पक्षाचे मित्रपक्षाचे नेते आहेत. डिसेंबर २०२३ मध्ये भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्याने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून पक्षाबरोबर युती न करण्याची विनंती केली होती, कारण त्यांच्यावर गंभीर आरोप आहेत. खरं तर जगातील सर्वात हे मोठे लैंगिक शोषण प्रकरण आहे. त्यांनी स्वतःच्या नेत्यांकडे दुर्लक्ष केले आणि युती केली. बलात्कारातील आरोपींसाठी प्रचार केला,” असे प्रज्वल रेवण्णा यांच्या विरोधात भाजपा नेते देवराज गौडा यांनी लिहिलेल्या पत्राचा संदर्भ देत खेरा यांनी मोदींवर हल्लाबोल केला.
हेही वाचाः एकमेव मुस्लीम खासदाराने सोडली एनडीएची साथ; डाव्या पक्षाच्या उमेदवाराला दिला पाठिंबा
काही दिवसांपूर्वी पंतप्रधान स्वतः त्यांच्या प्रचारासाठी गेले होते. ते त्यांच्याबद्दल चांगल्या गोष्टी सांगत होते. तुम्ही पंतप्रधान आहात आणि सर्व एजन्सी तुम्हाला सगळ्या गोष्टी कळवतात. जर तुम्हाला माहीत असेल की या व्यक्तीवर इतके गंभीर गुन्हे आहेत, तर तुम्ही त्याला तुमच्या कुटुंबातील सदस्य म्हणून कसे संबोधत आहात. तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही पंतप्रधानांच्या खुर्चीवर कसे आहात,” असेही ते म्हणाले आहेत.
भाजपाच्या जाहीरनाम्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत खेरा पुढे म्हणाले, “ते त्यांच्या १० वर्षांच्या राजवटीचे रिपोर्ट कार्ड देण्याऐवजी वाद घालत आहेत. भाजपाने काम केले नाही. रिपोर्ट कार्डच्या नावावर काहीही नाही. आता निवडणूक जिंकणे अवघड आहे हे साहेबांना कळून चुकले आहे. लोकांमध्ये प्रचंड रोष आहे आणि त्यामुळेच भाजपा लोकांमध्ये भीती निर्माण करीत आहे. देशात दर तासाला दोन तरुण आत्महत्या करीत आहेत, एका दिवसात ३० शेतकरी आत्महत्या करीत आहेत, दर एका तासाला चार महिलांवर बलात्कार होत आहेत. महिलांचा सन्मान आणि महिला सक्षमीकरणाच्या गप्पा मारणाऱ्या भाजपाच्या मित्रपक्षांच्या नेत्यांवर गंभीर आरोप होत आहेत.
हेही वाचाः अखिलेश यादवांची प्रतिष्ठा पणाला; गमावलेला गड परत मिळवण्यासाठी झुंज पण मतदारांचा कल भाजपाकडे?
काँग्रेसच्या जाहीरनाम्याबाबत बोलताना ते म्हणाले की, सामाजिक, आर्थिक, राजकीय विषमता सुनिश्चित केली जाणार आहे. काँग्रेस केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये मंजूर सुमारे ३० लाख रिक्त पदे भरणार आहे. देशातील ४० वर्षांखालील तरुणांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी ५ हजार कोटी रुपयांचा स्टार्टअप फंड ठेवण्यात येणार आहे. आता ४०० जागा दिल्या तर राज्यघटना बदलण्याची भाषा करीत आहेत. संविधानावर संकट आले तर सगळे तुरुंगात जातील. अमित शाहाजींनी डीपफेक व्हिडीओंवर विधान केले. कायदेशीर कारवाई करा, कोण रोखतंय? राहुल गांधींचे खोटे व्हिडीओ सोशल मीडियावर टाकणाऱ्या कॅबिनेट मंत्र्यांवर कारवाई कधी होणार? राहुल गांधींच्या अनेकदा फसवणूक केलेल्या व्हिडीओंबद्दल तुम्ही काय करता? भाजपा आणि काँग्रेससाठी कायदा वेगळा का काम करतो? असा प्रश्नही त्याने विचारला.