२०२४ मध्ये होणाऱ्या निवडणुकीत भाजपा आणि पंतप्रधान मोदींचा पराभव करायचा असेल, तर काँग्रेसला केवळ अल्पसंख्यक नाही, तर हिंदूंनादेखील बरोबर घेऊन पुढे जावं लागेल, असं विधान काँग्रेस नेते ए.के. अ‍ॅंटनी यांनी केलं आहे. तिरुवनंतपुरम़़मध्ये पक्षाच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे विधान केलं. दरम्यान, अ‍ॅंटनी यांच्या विधानानंतर भाजपानेही काँग्रेसवर टीकास्र सोडले.

हेही वाचा – उद्धव ठाकरेंनी मुंबई तोडण्याची भाषा करणाऱ्या कर्नाटकच्या मंत्र्यांचे मानले आभार; फडणवीसांशी संबंध जोडत म्हणाले…

Narendra Modi On Electoral Bond
“मी जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना…”, पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले?
People decided to defeat Congress and now they will defeat Modi too says Congress leader Prithviraj Chavan
लोकांनी ठरवून काँग्रेसला पराभूत केले तसेच आता ते मोदींनाही पराभूत करतील, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांचा विश्वास
Sangli, Congress palm symbol, Congress,
सांगलीत सलग दुसऱ्या निवडणुकीत काँग्रेसचे हाताचा पंजा चिन्ह गायब
PM Narendra Modi On Congress
पंतप्रधान मोदींचा काँग्रेसला खोचक टोला; म्हणाले, “बारशाला गेला आणि बाराव्याला…”

अ‍ॅंटनी नेमकं काय म्हणाले?

“आमागी २०२४ च्या निवडणुकीत काँग्रेसला केवळ अल्पसंख्यक नाही, तर हिंदूंनादेखील बरोबर घेऊन वाटचाल करावी लागेल. मोदी आणि भाजपाचा पराभव करायचा असेल, तर काँग्रेसला दोन्ही समुदायाचा पाठिंबा मिळवणे आवश्यक आहे. त्यासाठी आपल्याला हिंदूंना एकत्र करावे लागेल”, असं विधान काँग्रेस नेते अ‍ॅंटनी यांनी केले. मुस्लीम लोकं मशिदीत जातात. ईसाई लोकं चर्चमध्ये जातात. मात्र, एखादा हिंदू व्यक्ती जर मंदिरात जात असेल, तर त्याला हिंदुत्त्ववादी असल्याचे म्हटलं जातं. हेच जर पुढे सुरू राहिलं, तर २०२४ मध्ये भाजपाला याचा फायदा होईल, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – त्रिपुरामध्ये भाजपाच्या सातव्या आमदाराचा राजीनामा, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय उलथापालथ!

भाजपाची काँग्रेसवर टीका

अ‍ॅंटनी यांच्या विधानानंतर भाजपाने काँग्रेसवर टीकास्र सोडलं आहे. भाजपा नेते अमित मालविय यांनी अ‍ॅंटनी यांच्या विधानाचा व्हिडीओ ट्वीट करत, “काँग्रेससाठी भारतीय हे भारतीय नसून हिंदू, मुस्लीम, ईसाई आहेत, असं ते म्हणाले. तसेच अ‍ॅंटनी यांच्या विधानावरून राहुल गांधी यांचा मंदिरात जाण्यामगील हेतू स्पष्ट होतो”, अशी टीकाही त्यांनी केली.

दरम्यान, यापूर्वीही भाजपाने राहुल गांधींच्या मंदिरात जाण्यावरून टीका केली होती. भारत जोडो यात्रेदरम्यान, राहुल गांधींनी अनेकदा विविध मंदिरात जाऊन दर्शन केले होते. यावरून काँग्रेस हिंदुत्त्व केवळ मतांसाठी असल्याची असल्याची टीका भाजपाकडून करण्यात आली होती.