Karnataka Assembly Election 2023 : कर्नाटक विधानसभेची निवडणूक जशी जशी जवळ येऊ लागली आहे, तसे कर्नाटकात राजकीय वातावरण तापायला लागले आहे. टिपू सुलतान यांच्यावरून कर्नाटकात अनेक वाद निर्माण होताना दिसत आहेत. भाजपाचे नेते आणि राज्यमंत्री असलेले नेते स्वतःच्या चित्रपटनिर्मिती संस्थेच्या माध्यमातून वोक्कालिगा समुदायाचे म्होरके ‘उरी गौडा’ आणि ‘नांजे गौडा’ यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. भाजपाने दावा केला आहे की, अठराव्या शतकात या दोन नायकांनी टिपू सुलतानला मारले होते.

१६ मार्च रोजी, वृषाभद्री प्रॉडक्शन्सचे (Vrishabhadri Productions) मालक आणि फळबागमंत्री मुनीरत्न यांनी ‘उरी गौडा, नांजे गौडा’ या चित्रपटाच्या शीर्षक नोंदणीसाठी कर्नाटक फिल्म चेंबर्स ऑफ कॉमर्स (KFCC) या संस्थेकडे अर्ज केला आहे. या नोंदणीच्या दुसऱ्याच दिवशी जनता दल (सेक्यूलर)चे नेते आणि माजी मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांनी ट्वीट करत भाजपावर टीका केली. ते म्हणाले, ‘उरी गौडा’ आणि ‘नांजे गौडा’ या दोन चुकीच्या पात्रांवरून एक मोठे षडयंत्र रचले जात आहे. वोक्कालिगा समुदायातील नावांचे काल्पनिक पात्र रचून त्यांनी टिपू सुलतानला मारले, असे चित्र निर्माण करून कर्नाटकामधील वोक्कालिगा समुदायाला भरकटविण्याचा प्रयत्न भाजपा करत आहे. यामुळे वोक्कालिगांमध्ये इतिहासाकडे नकारात्मक दृष्टीने पाहण्याचे एक दुष्टचक्र सुरू होईल.

Santosh Parab attack case,
संतोष परब हल्ला प्रकरण : नितेश राणे यांना मंजूर जामीन रद्द करा, राज्य सरकारच्या याचिकेवर उच्च न्यायालयाची राणे यांना नोटीस
Raj Thackeray meets Salman khan
Video: राज ठाकरेंनी घेतली सलमान खानची भेट; गोळीबार प्रकरणात हल्लेखोरांचे फोटो आले समोर
Beed Lok Sabha
बीडमधील प्रचाराला ‘राज’कन्या विरुद्ध ‘शेतकरी पुत्र’ लढतीचा रंग
BJP leader conspiracy behind Arvind Kejriwal arrest
केजरीवालांच्या अटकेमागे भाजप नेत्याचे कारस्थान! संजय सिंह यांचा आरोप

दरम्यान, भाजपाचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री शोभा करंदालजे म्हणाल्या की, ‘उरी गौडा’ आणि ‘नांजे गौडा’ ही दोन्ही वास्तव पात्रे असून त्यांच्या संदर्भातील ऐतिहासिक दस्तऐवज उपलब्ध आहेत. या दोन्ही नायकांनी टिपू सुलतानच्या विरोधात लढा दिला आणि आपले कुटुंब तसेच म्हैसूरच्या महाराजांचे संरक्षण करण्याचा प्रयत्न केला. काँग्रेस आणि जेडी (एस)ला याची भाती का वाटते? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

हे वाचा >> ‘म्हैसूरचा वाघ’ टिपू सुलतान

कर्नाटकच्या राजकारणात टिपू सुलतान हे सध्या ध्रुवीकरणाचे माध्यम बनले आहेत. एका बाजूला, टिपू सुलतान ब्रिटिशांविरोधात लढणारे शूरवीर योद्धा होते, असे काँग्रेसचे मत आहे. तर भाजपाच्या म्हणण्यासुनार, टिपू सुलतानने हिंदूंचा नरसंहार आणि मंदिरांची विटंबना केली. टिपू सुलतानची जयंती या वेळी कर्नाटक राज्यात मोठी वादग्रस्त बाब ठरली. नुकतेच राज्याचे उच्चशिक्षणमंत्री सी अश्वथ नारायण म्हणाले की, ज्या पद्धतीने उरी गौडा आणि नांजे गौडा यांनी टिपू सुलतानला संपवले, त्या प्रकारेच काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांना संपवा. या विधानानंतर अश्वथ नारायण यांना टीकेचा सामना करावा लागला.

इतिहासकारांनी टिपू सुलतान यांच्या मृत्यूबाबत १७९९ च्या अँग्लो – म्हैसूर युद्धाचा संदर्भ दिला आहे. या युद्धात इंग्रजांकडून टिपू सुलतान मारले गेले. गौडा समुदायापैकी कुणी त्यांची हत्या केली, याबाबत ऐतिहासिक संदर्भ नसल्याचे इतिहासकारांचे म्हणणे आहे. कानडी लेखक अंदन्दा करिअप्पा यांनी लिहिलेल्या ‘टिपू निजाकंसागलू’ (Tipu Nijakanasugalu) (टिपूची खरी स्वप्ने) या पुस्तकातून गौडा समुदायाकडून टिपू यांची हत्या झाल्याचा दावा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, हे पुस्तक ऑक्टोबर २०२२ रोजी प्रकाशित करण्यात आले आहे.

हे वाचा >> “टिपू सुलतान चार वेळा इंग्रजांविरुद्ध लढले, सावरकरांनी चार वेळा माफी मागितली,” भर सभेत असदुद्दीन ओवैसी यांचे विधान

म्हैसूर विद्यापीठातील प्राचीन इतिहास आणि पुरातत्त्वशास्त्र विभागाचे निवृत्त प्राध्यापक एन. एस. रंगराजू यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला माहिती दिली की, उरी गौडा आणि नांजे गौडा हे हैदर अली यांच्या सेनेतील सैनिक होते. त्यांनी मराठ्यांच्या विरोधातील एका लढाईतून टिपू आणि त्यांच्या आईला संरक्षण देऊन वाचविले होते. टिपू यांचा मृत्यू चौथ्या अँग्लो – म्हैसूर युद्धात झाला होता. या युद्धासाठी लक्ष्मणमनी, ब्रिटिश, मराठे आणि निजाम एका तहानुसार एकत्र झाले होते. त्यांनी टिपूच्या विरोधात युद्धनीती तयार केली. या युद्धनीतीनुसार लढाईची वेळ, स्थळ आणि इतर रणनीतीचे काटेकोर नियोजन करून टिपू सुलतानच्या सेनेचा पाडाव करण्यात आला. त्या काळी टिपू सुलतान यांची सेना अभेद्य आणि शक्तिशाली असल्यामुळे एकट्या-दुकट्या शत्रू सैन्याला त्यांचा सामना करणे कठीण होत होते.

मागच्या वर्षी ऑगस्ट महिन्यात भाजपाने टिपू सुलतान यांच्या मृत्यूबाबत राजकारण करण्याची योजना आखल्याचा आरोप विरोधक करत आहेत. जुन्या म्हैसूर प्रांतात काँग्रेस आणि जेडी (एस) पक्षाचा प्रभाव कमी करण्यासाठी भाजपाने टिपू सुलतान यांच्यावर मंदिर पाडण्याचा आरोप केला. टिपू सुलतान यांनी श्रीरंगपटना येथील हनुमान मंदिर पाडून जामिया मशीद बांधली असल्याचे सांगण्यात आले. त्याचदरम्यान भाजपा नेत्यांनी मिरवणूक आणि जाहीर सभांद्वारे वोक्कालिगा नायकांनी टिपूला मारले असल्याची आख्यायिकाही पसरवली. काँग्रेस आणि जेडी (एस), ही दोन्ही पात्रे काल्पनिक असल्याचे सुरुवातीपासून सांगत आहेत .

हे वाचा >> विश्लेषण : ‘टिपू सुलतानची ‘जामिया’ मशीद नव्हे, ‘हनुमान मंदिर’, कर्नाटक उच्च न्यायालयासमोर नवा वाद; वाचा काय आहे प्रकरण!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची १२ मार्च रोजी बंगळुरू-म्हैसूर महामार्गानजीक असलेल्या मंड्या येथे जाहीर सभा आणि मिरवणूक संपन्न झाली. या वेळी भाजपाने पंतप्रधान मोदी यांच्या स्वागतासाठी उरी आणि नांजे गौडा यांच्या नावांची कमान रस्त्यावर उभारली होती. या कमानीवर टीका झाल्यानंतर या ठिकाणी वोक्कालिगा समाजाचे श्रद्धास्थान श्री बालगंगाधरनाथ स्वामी यांच्या नावाची कमान उभारण्यात आली.