बिजू जनता दलातून हकालपट्टी केलेले माजी मंत्री आणि गोपाळपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रदीप पाणिग्रही यांनी बुधवारी सर्व चर्चेला पूर्णविराम देत भाजपामध्ये प्रवेश केला. प्रदीप आणि त्यांच्या काही समर्थकांनी औपचारिकपणे भाजपा पक्षात प्रवेश केला. भाजपा कार्यालयात प्रदेशाध्यक्ष मनमोहन सामल यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. प्रदीप पाणिग्रही भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा यापूर्वीच होती, ती आज संपुष्टात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २० नोव्हेंबर २०२० रोजी माजी मंत्री आणि आमदार प्रदीप पाणिग्रही यांना लोकविरोधी कारवायांसाठी बीजेडीच्या प्राथमिक सदस्यत्वातून काढून टाकण्यात आले होते. पक्षाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात प्रदीप यांची बीजेडीतून हकालपट्टी करण्यात आल्याचे म्हटले आहे. आज भाजपात प्रवेश केल्यानंतर प्रदीप पाणिग्रही यांनी बीजेडीवर जोरदार हल्ला चढवला.
ओडिशात BJD ला मोठा धक्का! मुख्यमंत्री पटनायकांच्या जवळचा महत्त्वाचा नेता भाजपात दाखल!
मिळालेल्या माहितीनुसार, २० नोव्हेंबर २०२० रोजी माजी मंत्री आणि आमदार प्रदीप पाणिग्रही यांना लोकविरोधी कारवायांसाठी बीजेडीच्या प्राथमिक सदस्यत्वातून काढून टाकण्यात आले होते.
Written by वैभव देसाई
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 22-02-2024 at 13:44 IST
मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three time mla and former minister close to chief minister naveen patnaik joins bjp bjd will suffer in south odisha vrd