गेल्या तीन दशकांप्रमाणेच यंदाही भाजपाचे अनुभवी खासदार संतोष गंगवार हे आगामी लोकसभा निवडणुकीत त्यांचा बालेकिल्ला बरेली येथून लढण्यासाठी तयारी करीत होते. पण गेल्या महिन्यात होळीच्या दिवशी पक्षाने यादी जाहीर केल्यावर त्यांना धक्का बसला. संतोष गंगवार यांच्याऐवजी माजी राज्यमंत्र्यांना मैदानात उतरवण्यात आले आहे. ३५ वर्षांनंतर पहिल्यांदाच बरेली लोकसभा मतदारसंघाची निवडणूक संतोष गंगवार यांच्याशिवाय होत आहे. २००९ चा अपवाद वगळता याच जागेवरून संतोष गंगवार यांनी आठ वेळा लोकसभा निवडणूक जिंकली आणि २००९ मध्ये त्यांना काँग्रेसच्या उमेदवाराकडून केवळ ९ हजार मतांनी पराभव पत्करावा लागला. यावेळी भाजपा नेतृत्वाने संतोष गंगवार यांचे वय लक्षात घेऊन त्यांना तिकीट दिले नाही. त्यामुळे या जागेवरील लढत रंजक होत आहे. भारतीय जनता पक्षाने संतोष गंगवार यांच्या जागी छत्रपाल सिंह गंगवार यांना उमेदवारी दिली आहे. २००९ मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक जिंकलेल्या प्रवीणसिंह आरोन यांना सपाने तिकीट दिले आहे. बसपाने छोटेलाल गंगवार यांना येथे तिकीट दिले होते, मात्र त्यांचा उमेदवारी अर्ज फेटाळण्यात आला होता. त्याचा पुरेपूर फायदा भारतीय जनता पक्षाचे उमेदवार छत्रपाल सिंह गंगवार यांना होणार आहे. कुर्मी मतांची जी विभागणी बसपा उमेदवारामुळे झाली असती ती आता होणार नाही. त्यामुळेच येथील लढत रंजक असली तरी या कुर्मीबहुल जागेवर भाजपाचा प्रभाव स्पष्ट दिसत आहे.

भाजपाला उत्तर प्रदेशमध्ये लोकसभेच्या जागांची संख्या वाढवायची आहे. गंगवार यांना वगळण्याच्या निर्णयाने मतदारसंघात भाजपाला फटका बसण्याची शक्यता पाहता पक्षाने आतापासूनच जुळवाजुळव सुरू केली आहे. बरेली ही भाजपासाठी सर्वात सुरक्षित जागा मानली जाते. बरेलीमध्ये तिसऱ्या टप्प्यात ७ मे रोजी मतदान होणार आहे. माजी केंद्रीय मंत्री राहिलेले संतोष गंगवार बरेलीमधून १९८९ पासून जिंकत आहेत. २००९मध्ये ती जागा काँग्रेसने जिंकली होती. परंतु आता अंतर्गत मतभेदांमुळे भाजपाने त्यांना डावलून माजी राज्यमंत्री आणि माजी आमदार छत्रपाल सिंह गंगवार (६८) यांना उमेदवारी दिली, त्यांच्याकडे बाहेरचे म्हणून पाहिले जात आहेत. तसेच ते अन्य मागासवर्गीय वर्गातील असून, कुर्मी समाजाचे प्रतिनिधित्व करतात. यामुळे संतोष गंगवार संतप्त झाले आहेत, कारण एक शेतकरी समुदाय आहे, जो प्रदेशातील सर्वात मोठा आणि सर्वात प्रबळ ओबीसी गट आहे आणि बरेलीमध्ये त्यांची तीन लाखांहून अधिक मते आहेत.

संतोष गंगावार यांच्या विरोधातील कथित एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्या क्लिपमध्ये बरेलीचे महापौर उमेश गौतम हे “आता त्यांना आम्ही लक्ष्य करू”, असे म्हणाले होते. लोकसत्तानेही या कथित क्लिपची सत्यता तपासलेली नाही. खरं तर ब्राह्मण समाजातील गौतम हे तिकिटाच्या इच्छुकांपैकी एक होते. क्लिपबद्दल त्यांना विचारले असता ते म्हणाले, ऑडिओमध्ये संतोष गंगवार यांच्याविरोधात काहीही म्हटले नाही.

परंतु या ऑडिओ क्लिपने गंगवारचे समर्थक आणि कुर्मी समुदाय नाराज झाला, त्यामुळे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष भूपेंद्र चौधरी यांना ८ एप्रिल रोजी बरेली येथे दिग्गज नेत्याला भेटण्यास जावे लागले. मात्र गंगवार यांच्या समर्थकांनी चौधरी यांना घेराव घालून गौतम यांना बडतर्फ करण्याची मागणी केली. या वादाबद्दल गंगवार यांना विचारले असता ते म्हणाले, “महापौरांच्या टिप्पणीबद्दल मला काहीही म्हणायचे नाही. मी पक्षाच्या निर्णयाचा आदर करतो (त्यांना तिकीट नाकारणे) आणि विजय निश्चित करण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे.”

हेही वाचाः लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल होताच देवेगौडा यांच्या नातवाचे परदेशात पलायन

कुर्मी लोकांमधील या तीव्र नाराजीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २६ एप्रिल रोजी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासमवेत बरेली येथे ४५ मिनिटांचा रोड शो आयोजित केला होता. आदल्या दिवशी पंतप्रधानांनी बरेली जिल्ह्यातील देउचारा येथे एका जाहीर सभेला संबोधित केले होते. विशेष म्हणजे संतोष गंगवार यांनी आंवलाचे उमेदवार धर्मेंद्र कश्यप आणि बदायूचे उमेदवार दुर्विजय सिंह शाक्य यांच्यासमवेत मंच सामायिक केला. गंगवार जवळच्या पिलीभीतमध्ये मोदींच्या कार्यक्रमांना देखील उपस्थित होते, जिथे पहिल्या टप्प्यात १९ एप्रिल रोजी मतदान झाले होते. संतोष गंगवार हे आता उघडपणे पक्षाच्या उमेदवाराच्या बाजूने आहेत. आता कुर्मी प्राबल्य असलेल्या जागांवर मागासवर्गीय आणि अत्यंत मागासलेल्या लोकांची मते भाजपाच्या बाजूने येत आहेत.

हेही वाचाः ऐन निवडणुकीत सेनापतींनीच सोडली साथ; दिल्ली काँग्रेस अध्यक्षांचा राजीनामा

सपाची रणनीती आता कामी येत नाही

प्रवीण सिंह आरोन हे समाजसेवा करणारे नेते असून लोकांनी त्यांना साथ दिली पाहिजे, असे तिथले स्थानिक सांगतात. समाजवादी पक्षाने माजी खासदार आणि माजी आमदार प्रवीणसिंह आरोन यांना उमेदवारी दिली आहे. वैश्य समाजाची मते पक्षाला मिळावीत यासाठी समाजवादी पक्षाने रणनीतीचा भाग म्हणून हे पाऊल उचलले. प्रवीण आरोन वैश्य समाजातून आले असले तरी सपाची रणनीती इथे काम करत नाही.

प्रवीण सिंह यांनी जवळपास सर्वच निवडणुका लढवल्या, पण त्यांना फारसा करिष्मा दाखवता आला नाही. याशिवाय ग्रामीण भागात त्यांची पकड खूपच कमकुवत आहे. समाजवादी पक्षाच्या एका समर्थकाचे म्हणणे आहे की, त्यांची शहरात चांगली पकड आहे. मात्र गावात त्यांना फारसा करिष्मा करता येणार नसून पक्षाच्या बळावर त्यांना मते मिळतील. अनेकांनी छत्रपाल सिंह यांच्या ट्रॅक रेकॉर्डवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. २००७ आणि २०१७ मध्ये त्यांनी पिलीभीत लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या बहेरी येथून राज्याच्या निवडणुका जिंकल्या असल्या तरी दुसऱ्यांदा थोड्या फरकाने विजय मिळवला, २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा सपाकडून पराभव झाला.

दरम्यान, सपाचे उमेदवार आरोन हे वैश्य समाजातील आहेत. त्यांना मुस्लिमांचाही पाठिंबा मिळण्याची आशा आहे. मतदारसंघातील १९ लाख मतदारांपैकी सहा लाख मते अल्पसंख्याक समाजातील आहेत. कुर्मींचा पाठिंबा मिळवण्यासाठी त्यांना पक्षाचे सहकारी नेते भागवत सरन गंगवार यांची मदत मिळत आहे, ज्यांनी पिलीभीतमधून निवडणूक लढवली होती. बसपा उमेदवाराचा अर्ज नाकारण्यात आला आहे. माझा विजय निश्चित केला, मला शंका नाही. जर ईव्हीएममध्ये छेडछाड झाली नाही, तर माझा विजय इथे कोणीही रोखू शकत नाही,” असे ते म्हणाले.

वैश्य मतदार भाजपाकडे जात आहेत

बरेलीचे मतदार सांगतात की, त्यांचे मत मोदींना जाईल, ते जातीच्या नावावर कोणाला मत देत नाहीत. वैश्य मतदार भाजपाकडे जात आहेत. प्रवीणसिंह आरोन यांना मुस्लिम मते एकजुटीने मिळत असली तरी त्यांना दलित मतांमध्ये खीळ घालता आलेली नाही. बहुजन समाज पक्षाच्या उमेदवाराचा अर्ज फेटाळण्यात आल्याने आणि आता एकही उमेदवार रिंगणात नसल्याने येथे दलित मतांना अधिक महत्त्व आले आहे. त्यामुळे दलित मतदारांचा पाठिंबा मिळविण्यासाठी भारतीय जनता पक्ष आणि समाजवादी पक्ष यांच्यात जोरदार प्रयत्न सुरू आहेत. मात्र, बिगर जाटव मतदार पूर्णपणे भाजपाबरोबर जात असल्याने जाटव मतदारांमध्ये फूट पडू शकते.

बरेली शहरातही मुस्लिम मतदारांची संख्या मोठी आहे आणि भोजीपुरामध्येही मुस्लिम मतदारांची संख्या मोठी आहे. मुस्लिमांचा समाजवादी पक्षाचा पाठिंबा आहे. भारतीय जनता पक्षाचा बरेलीमध्ये बराच काळ प्रभाव आहे. एवढेच नाही तर लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या पाच जागांपैकी चार भाजपाकडे तर भोजीपुरा समाजवादी पक्षाच्या ताब्यात आहे. २०१९ मध्ये भारतीय जनता पक्षाचे संतोष गंगवार यांनी बरेली लोकसभेची जागा एक लाख ६८ हजार मतांनी जिंकली होती. तर २०१४ मध्ये गंगवार अडीच लाख मतांनी विजयी झाले होते.